Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरत चेन्नईबाधित शेतकरी अल्पमावेजामुळे संतप्त ; उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ

उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील यांनी चेन्नई सुरत बाधित शेतकऱ्यांची प्रस्ताव पडताळणीसाठी आज बोलावलेली बैठक संतप्त शेतकऱ्यांमुळे निष्पळ ठरली ठरली. चेन्नई सुरत महामार्गासाठी अल्पमावेजा मिळत असल्याने तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपली जमीन देणार नाही असे लेखी निवेदन दिले आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 27, 2023 | 06:21 PM
सुरत चेन्नईबाधित शेतकरी अल्पमावेजामुळे संतप्त ; उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ
Follow Us
Close
Follow Us:

अक्कलकोट :  उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील यांनी चेन्नई सुरत बाधित शेतकऱ्यांची प्रस्ताव पडताळणीसाठी आज बोलावलेली बैठक संतप्त शेतकऱ्यांमुळे निष्पळ ठरली ठरली. चेन्नई सुरत महामार्गासाठी अल्पमावेजा मिळत असल्याने तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपली जमीन देणार नाही असे लेखी निवेदन दिले आहे. अनेक वेळा उग्र आंदोलन केले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांनी रक्कम स्वीकारली नाही.शेतकऱ्यांना अडकवण्यासाठी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी निवृत्त झिरो वसूलदारांना पाठवून आजच्या बैठकीची क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली आजची बैठक उधळली.

शेतकऱ्यांची बाजारभावाने अथवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे रक्कम मिळण्याची मागणी असताना हिटलरशाही पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांना संपवण्याचा वेगवेगळ्या डाव आपल्या एजंटामार्फत टाकत असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे चार जिल्हे धुममसत असताना वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांनी चेन्नई सुरत महामार्गाला जमिनी देणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने या भागातील रस्त्याचे काम ठप्प झाले आहे .

आजच्या बैठकीत महेश हिंडोळे यांनी देखील तीव्र विरोध केला. भूसंपादन कार्यालयातील निवृत्त अधिकारी वसुलीचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याला तातडीने हटवण्याची मागणी ग्रीन फील्ड संघर्ष समितीचे प्रमुख स्वामीनाथ हरवाळकर यांनी केली आहे. सरकार योग्य मोबदला दिला नाही तर शेतकरी समाज या सरकारचा विसर्जन करतील असेही हरवाळकर यावेळी म्हणाले. यावेळी सुभाष शिंदे जाधव राजशेखर कुंभार कल्याणराव माळी चिदानंद हलसंगी यासह बाधित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Surat chennai affected farmers angry over shortage the meeting of deputy district magistrates was fruitless nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2023 | 06:21 PM

Topics:  

  • Akkalkot
  • maharashtra
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.