Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात १८ मे ते १८ जून दरम्यान ‘शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षण अभियान २०२६-२७’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ७३३ गावांमध्ये घरोघरी जाऊन सुमारे ९.१९ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 08:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा जिल्ह्यात ‘शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षण अभियान २०२६-२७’ राबविण्यात येत आहे. १८ मे ते १८ जून या कालावधीत सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या ७३३ गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अभियानात सुमारे ९ लाख १९ हजार ५०५ नागरिकांची शारीरिक तपासणी केली जाणार असून, कुष्ठरोगाच्या संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाभर प्रशिक्षित तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्वेक्षणाची नियमित पाहणी केली जाणार असून तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कुष्ठरोग हा पूर्णपणे उपचाराने बरा होणारा आजार आहे. यासाठी आवश्यक औषधे आणि उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वेक्षणादरम्यान आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. नागरिकांच्या शरीरावर असलेले कोणतेही चट्टे, गाठी, त्वचेवरील संवेदना कमी होणे किंवा इतर संशयित लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करून योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. तसेच कुष्ठरोगाबाबत जनजागृती, रुग्ण शोध मोहीम आणि उपचार प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. डॉ. के. व्ही. राठोड यांनी कुष्ठरोगाची संशयित लक्षणे, निदान पद्धती, उपचार आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर माहिती दिली. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सर्वेक्षणासाठी सज्ज करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, तपासणी पथकांना सहकार्य करून कुष्ठरोगमुक्त समाजाच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Survey for zero leprosy villages begins over 9 lakh citizens to be screened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
4

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.