
Washim QR Code Scam
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील अधिकारी व अंमलदारांना दिल्या. यावरून तत्काळ ४ पथकांनी घटनास्थळ परिसरातील व इतर ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहणी केली असता सदर गुन्हयातील संयशित व्यक्ती दिसून आले. गुप्त बातमीदारांमार्फत त्यांचे नाव व राहण्याचे ठिकाण माहिती करून घेतले असता त्यांची नावे तन्मय शंकर मुठाळ (१९, रा. चिवरा, ता. मालेगाव, जि. वाशिम), युगंधर मोहन अफुने (१८, रा. अंबिकानगर, लाखाळा, ता. जि. वाशिम), सुमित कैलास भोने (१८, रा. सावरगाव जिरे, ता. जि. वाशिम) अशी असल्याची समजले. वरून नमूद तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन वाशिम शहर येथील अधिकारी व अंमलदारांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानंतर नमूद तिन्ही आरोपींना कायदेशिररित्या अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक सुधाकर आढे, स्थानिक गुन्हे शाखा, जि. वाशिम, पोलिस निरीक्षक संजय चौधरी, पो. स्टे. वाशिम शहर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र आडोळे, सपोनि सीता वाघमारे, पोउपनि नीलेश जाधव, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि शेखर मास्कर आदींनी केली.
शहरातील मारुती जय भवानी गणेश मंडळाच्या गणेशमूतीला तसेच हनुमान मंदिरात लावलेल्या क्यूआर कोड स्कॅनरमधून अश्लील व्हिडीओ दाखविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वाशिम पोलिसांनी या प्रकरणी ३ तरुणांना अटक केली.
वाशिम, उपविभागीय पोलिस अधिकारी, रामकृष्ण पवार म्हणाले की, या तिन्ही तरुणांनी टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला व त्यात अश्लील व्हिडीओ टाकून ते स्कॅनरला जोडण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे स्कॅनर लावून जास्तीत जास्त नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व्हिडीओ दिसून त्याद्वारे १५ ते २० रुपयांची कमाई करण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.