Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींसह काँग्रेसची कोंडी होणार? सुशीलकुमार शिंदेंकडून ‘स्वातंत्र्यवीरां’चे कौतुक, आत्मचरित्रात नेमकं काय?

दरम्यान 'फाइव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स' या सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचारित्राचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. मात्र यातील सावरकरांच्या कौतुकामुळे कॉँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी परखड मत मांडले आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेस पक्षाची आणि राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलची भूमिका ही सर्वश्रुत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2024 | 05:36 PM
राहुल गांधींसह काँग्रेसची कोंडी होणार? सुशीलकुमार शिंदेंकडून 'स्वातंत्र्यवीरां'चे कौतुक, आत्मचरित्रात नेमकं काय?

राहुल गांधींसह काँग्रेसची कोंडी होणार? सुशीलकुमार शिंदेंकडून 'स्वातंत्र्यवीरां'चे कौतुक, आत्मचरित्रात नेमकं काय?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असलेली भूमिका सर्व देश जाणून आहे. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीरांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे पाहायला मिळते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अनेक जण कोर्टात देखील गेले आहेत. मात्र आता कॉँग्रेसची या विषयावरून कोंडी होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. आता या गोष्टीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे.

सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीरांचे कौतुक करण्यात आले आहे. सावकरकरांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. कॉँग्रेसला विचारसरणी सुधरण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचारित्रामध्ये मांडले आहे.

“माझ्या मनामध्ये सावरकरांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे १९८३ मध्ये नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपुष्टात आणण्यासाठी सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वता: मागासवर्गीय असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा निघाला की, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसारणीवर इतका का भर दिला जातो याचे मला आश्चर्य वाटते. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. खूप काळ राजकारणात काम केल्यानंतर मला अस वाटत की, कॉँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे”, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

दरम्यान ‘फाइव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स’ या सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचारित्राचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. मात्र यातील सावरकरांच्या कौतुकामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी परखड मत मांडले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची आणि राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दलची भूमिका ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी होऊ शकते. भाजप हा मुद्दा धरून काँग्रेसवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

Web Title: Sushil kumar shinde appreciate swatantryaveer savarkar work in five decades of politics book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 05:31 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.