Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swadeshi Diwali 2026 : दिवाळी खरेदीसाठी मुंबईकरांना खास संधी! प्रियदर्शिनी पार्कमध्ये स्वदेशी उत्सव

Swadeshi Diwali 2026 : मुंबईतील मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 28, 2026 | 09:21 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे हा उद्देश  
  • शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक उपक्रम  
  • उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती 
Swadeshi Diwali 2026 :  स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिला बचत गट आणि व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६’ या तीन दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महोत्सवाच्या आयोजक ॲड. सुशिबेन शाह यांनी दिली.

या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री. मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

मुंबईतील मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्क येथे शुक्रवार, ३० ऑक्टोबर ते रविवार, १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ॲड. सुशिबेन शाह म्हणाल्या की, या महोत्सवात ११० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादने, हस्तकला, स्थानिक उद्योजकांची उत्पादने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी २० हून अधिक मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, पपेट शोदेखील महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.

स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे हा उद्देश

स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि नागरिकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. दिवाळीच्या खरेदीच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनांना आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा संदेश या महोत्सवातून दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक उपक्रम

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. आनंदोत्सवाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.

Washim: दुष्काळाने रब्बीच्या पेरणीसमोर दुहेरी संकट, आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले; सरकारच्या मदतीकडे लक्ष

उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री. मिलिंद देवरा उपस्थित राहणार आहेत. यावेळी नेत्या सौ. मीनाताई कांबळी, सौ. सीमा सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईकरांनी या तीन दिवसीय ‘स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६’ ला भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सुशिबेन शाह यांनी केले आहे.

BMC Employees Diwali Bonus : दिवाळीपूर्वी बंपर गिफ्ट! BMC कर्मचाऱ्यांना तब्बल 33000 रुपयांच्या बोनसची घोषणा; कधी जमा होणार पैसे?

Web Title: Swadeshi diwali utsav 2026 mumbai priyadarshini park sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • BJP-Shivsena
  • Dr Shrikant shinde
  • eknath khadse

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.