Washim farmers financial crisis
वाशिम: जिल्हयात दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि रब्बीच्या पेरणीसमोरील आर्थिक संकट यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनचे पीक हातातून गेले असून, कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, हळदीच्या कंदांची पाण्याअभावी खुंटलेली वाढ आणि विविध रोगांचे संकट, तर तुरीच्या पिकाचेही नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
खरीप हंगामात झालेल्या नुकसानीतून आशेने पाहत असताना, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने गहू, हरभरा आणि चिया या पिकांची पेरणी करण्याचा प्रश्न निर्माण सावरण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला. कृषी विभागाच्या खरीप पीक नियोजनाच्या आकडेवारीनुसार, यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक २ लाख १९ हजार ६५१.७१ हेक्टर क्षेत्र असून, त्याखालोखाल कापसाचे २१ हजार ४६४.०७ हेक्टर, तुरीचे १० हजार ६८३.६.३ हेक्टर, मक्याचे ९ हजार ३२.१० हेक्टर, उडदाचे ५ हजार ३८.१.१० हेक्टर आणि मुगाचे ३ हजार ६.७१.०१ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय इतर खरीप पिकांचीही मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात झाली आहे.
मात्र, प्रतिकूल पावसाची परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित, उत्पादन पडण्याची आशा धूसर झाली आहे. एका बाजूला शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा संपुष्टात येत असताना दुसऱ्या बाजूला बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर झालेला खर्च तसेच कर्जाची परतफेड यांचा डोंगर कायम आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या या आर्थिक संकटावर कितपत मात करणार आणि या तुटपुंज्या रकमेत शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसातील खंड, अपुरा पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याची कमतरता यांचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनला सर्वाधिक क्षेत्र देण्यात आले असल्याने या पिकाचे नुकसान म्हणजे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालेला आघात आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार सोयाबीनचे क्षेत्र २,१९,६५१.७१ हेक्टर असून, कापूस, तूर, मका, उडीद आणि मूग यांसारख्या पिकांनाही शेतकऱ्यांनी पसंती दिली. मात्र, पीक नियोजन करताना अपेक्षित असलेली परिस्थिती आणि प्रत्यक्ष शेतात निर्माण झालेली परिस्थिती यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे.
सोयाबीनच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, फवारणी आणि मशागतीवर खर्च केला. परंतु पिकाचे अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास हा खर्च भरून काढायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. खरीप हंगामातील उत्पनावरच अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. याच उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च, कर्जाची परतफेड आणि पुढील हंगामाची तयारी केली जाते. मात्र, यंदा खरीप पिकांनीच साथ सोडल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन विस्कळीत झाले.
सोयाबीनपाठोपाठ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत, कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनबावत चिंता वाढली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतक-यांना औषच फवारणी आणि इतर उपाययोजनांवर खर्च करावा लागत आहे. आधीच आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना आणखी फवारणी करूनही पिकाची स्थिती सुधारेल खर्च करणे अनेकांना परवडत नाही की नाही, याची खात्री नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.






