Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Brothers : गुढीपाडव्याला बंधू मिलन? राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? निमंत्रण पत्रिका व्हायरल

कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काही नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 13, 2025 | 05:49 PM
गुढीपाडव्याला बंधू मिलन? राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? निमंत्रण पत्रिका व्हायरल

गुढीपाडव्याला बंधू मिलन? राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? निमंत्रण पत्रिका व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काही नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन्ही मोठे नेते. ठाकरे बंधू एकत्र आले तर शिवसेना किंवा मनसेला अधिक बळ मिळेल असं बोललं जातं. मात्र अद्याप तसं काही झालेलं नाही. अशातच आता बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर लावलेल्या निमंत्रण पत्रिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मराठी लोकांची इच्छा आहे. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते नेहमीच ठाकरे ब्रँड एकत्र यावा अशी इच्छा व्यक्त करत असतात. यासाठी आता मराठी सेनेने पुढाकार घेतला असून ठाकरे बंधु एकत्र येणार अशा आशयाचे पोस्टर्स बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर झळकलेत.

मराठी सेनेचे नेते मोहनिश राऊळ यांनी हे पोस्टर्स लावलेत. मोहनिश राऊळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी “बंधू मिलन” कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे.

भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी 11 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असं या पत्रिकेमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ठाकरे ब्रँड एकत्रितपणे लोकांसमोर यावा. दोघांनी एकत्र येऊन येणाऱ्या महापालिका निवडणूका एकत्रित लढवाव्यात. जेणेकरुन महाराष्ट्रात सन्मानाने जगता येईल. यासाठीच हा कार्यक्रम ठेवला असून त्यादिवशी दोन्ही ठाकरेंना निमंत्रण दिले जाईल, असे मोहनिश राऊळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Tackeray borthers will join together on gudhi padwa maharahtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
4

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.