Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर

Maharashtra Politics : मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची थेट ऑफर दिली आहे. एवढंच नाही तर पक्षात आलात तर मंत्रीपदही देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 20, 2026 | 09:34 PM
Eknath Shinde and Sharad Pawar

Eknath Shinde and Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • भरत गोगावलेंची शरद पवारांच्या आमदाराला ऑफर
  • माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना थेट निमंत्रण
  • कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात राजकीय नेत्यांची मांदियाळी
 

पंढरपूर : राज्याच्या राजकारणात सध्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदाराला मोठी ऑफर दिली आहे. ‘आमच्यात या, थेट मंत्रिपद देतो’ असं विधान केल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेचा मुद्दा गरम असताना तसेच डिलिमिटेशवरुन शरद पवार गटात सुरु असलेल्या घडामोडीवरून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Maharashtra Politics)

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी थेट शरद पवार गटाच्या आमदारालाच आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्यास मंत्रीपदही देऊ, असं जाहीर आश्वासन त्यांनी दिलं आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारसंघातील आमदार आहेत. त्याचबरोबर ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत. अशा परिस्थितीत त्यांना थेट शिवसेनेत येण्याचं निमंत्रण मिळाल्याने या वक्तव्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. मंत्री भरत गोगावले कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. याच वेळी त्यांनी अभिजीत पाटील यांच्याबाबत हे विधान केलं.

Rohit Pawar : रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, डीके शिवकुमार यांच्यासोबत झाली बैठक?

‘आमच्याकडे आलात तर मंत्रीपदही देऊ’

भरत गोगावले म्हणाले की, आपण संकटात असतो तेव्हा देव आपल्या मदतीला उभा राहतो. मात्र देवच अडचणीत असताना अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिले, असं म्हणत त्यांनी अभिजीत पाटील यांचे आभार मानले.

यावेळी त्यांनी थेट ऑफर देताना, ‘आमच्याकडे येण्याचं झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो,’ असं उपस्थित जनसमुदायासमोर सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे अभिजीत पाटील शिंदे गटात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अभिजीत पाटील यांनी या ऑफरवर अद्याप काय प्रतिक्रिया दिली आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात राजकीय नेत्यांची मांदियाळी

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण पंढरपूर भक्तिमय झालं आहे.

या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी दिलेली राजकीय ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Rohit Pawar reply on Narco test : ‘आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा…!’ रोहित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: भरत गोगावले यांनी कोणत्या आमदाराला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना भरत गोगावले यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.

  • Que: भरत गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना काय आश्वासन दिलं?

    Ans: अभिजीत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना मंत्रीपदही देऊ शकतो, असं भरत गोगावले यांनी जाहीरपणे म्हटलं.

  • Que: भरत गोगावले यांनी हे वक्तव्य कुठे केलं?

    Ans: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.

Web Title: Maharashtra politics bharat gogawale offer abhijit patil shiv sena minister post vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • shivsena

संबंधित बातम्या

Rohit Pawar : रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, डीके शिवकुमार यांच्यासोबत झाली बैठक?
1

Rohit Pawar : रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, डीके शिवकुमार यांच्यासोबत झाली बैठक?

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!
2

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
3

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.