Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचला ; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांची मागणी

गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात.

  • By Aparna
Updated On: Oct 09, 2022 | 07:22 PM
भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचला ; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांची मागणी
Follow Us
Follow Us:

पुणे: गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्रात म्हटले आहे की, मिठाई, दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दुकानदार हे भेसळ करण्याची दाट शक्यता असते. अन्न पदार्थांमधील भेसळ ही अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे. सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी भेसळविरोधी पथकाची स्थापना केली जाऊ शकते. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि भेसळविरहीत अन्नपदार्थ मिळू शकतील. तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दसरा आणि दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या देशात या सणांसोबत मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांचे नाते जोडले गेले आहे; किंबहुना हे अन्नपदार्थ आपल्या संस्कृतीचा एक भागच बनले आहेत.

भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने दुकाने आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई बनवणाऱ्या कारखान्यांवर धाडी टाकल्या पाहिजेत. जर कोणी भेसळ करताना दोषी आढळला तर त्याच्याकडून सक्तीने दंड वसूल केला जावा आणि त्याचा परवाना रद्द केला जावा. सरकारने कारवाई व्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भेसळीविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Take strict steps to prevent adulteration nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 07:15 PM

Topics:  

  • Diwali
  • maharashtra
  • Pune
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
1

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
2

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष
3

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
4

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.