
महाघोटाळा! 'आयुष्मान भारत' योजनेच्या नावाखाली गरीबांची उघड्याडोक्याने लूट,'नवराष्ट्र'च्या दणक्याने प्रशासन हादरले
मिळालेल्या माहितीनुसार, शिंगवे पारगाव येथील रुग्ण गणपत आतकरी हे उपचारासाठी आधार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्याकडे सरकारमान्य ‘आयुष्मान भारत कार्ड’ उपलब्ध होते, ज्या अंतर्गत सर्व उपचार मोफत होणे बंधनकारक आहे. मात्र, आरोपानुसार डॉक्टर चव्हाण यांनी या कार्डला केराची टोपली दाखवत, रुग्णाच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला आणि चक्क २० हजार रुपये रोख उकळले. जर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असेल, तर गरिबांकडून पैसे का उकळले जात आहेत? ही योजना नेमकी कोणासाठी आहे? गरिबांचे रक्त शोषणाऱ्या अशा डॉक्टरांची गय केली जाणार नाही!” अशा तीव्र भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.
‘नवराष्ट्र’ने हे वृत्त लावून धरताच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केले आहे की, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून गोरगरिबांच्या हक्कावर दरोडा टाकण्यासारखा आहे.
मंगेश चिवटे हा संपूर्ण प्रकार राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आहेत.
आयुष्मान योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या आणि रुग्णांची लूट करणाऱ्या अशा रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे.या प्रकरणात प्रशासनाकडून तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन चिवटे यांनी दिले आहे.
Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…