Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे आणि गणेश विघ्ने यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 04:10 PM
RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • परिवहन विभागात भ्रष्टाचाराला थारा नाही
  • चौकशीतील अधिकाऱ्यांना सक्तीची रजा : प्रताप सरनाईक
  • संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर, IPS अधिकाऱ्यांकडे चौकशी
मुंबई : परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली.

विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला मुद्दा

विधानसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय

सरनाईक यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि तपास निष्पक्षपणे पार पडावा, यासाठी खालील अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार

मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे

मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने

IPS अधिकाऱ्यांकडे तपासाची जबाबदारी

या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी सुनिश्चित करण्यासाठी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “परिवहन विभागात भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये आणि सत्य बाहेर यावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.”

जनविश्वास टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध

राज्याच्या परिवहन व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी आणि जनतेचा विश्वास कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराविरोधातील ही मोहीम केवळ या प्रकरणापुरती मर्यादित राहणार नसून, भविष्यातही अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या या निर्णयामुळे आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

Web Title: Maharashtra rto corruption case officers forced leave pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • RTO

संबंधित बातम्या

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
1

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
2

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

‘आरमोरी’ ब्रिटिशकाळातील ‘शस्त्रागार’! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य
3

‘आरमोरी’ ब्रिटिशकाळातील ‘शस्त्रागार’! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य

Uniform Civil Act: मोठी बातमी! UCC लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारची तयारी; ७ सदस्यीय समिती स्थापन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
4

Uniform Civil Act: मोठी बातमी! UCC लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारची तयारी; ७ सदस्यीय समिती स्थापन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.