Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विजय मिश्रा याच्या बेकायदेशीर कमाईतून उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १००.२५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये उमरगा-लातूर रस्त्यावरील जकेकुर औद्योगिक वसाहतीतील 'लल्ली ॲग्रो इंडस्ट्रीज एलएलपी'चा दाल मिल प्रकल्पही समाविष्ट आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 05:01 PM
गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई
  • गँगस्टर विजय मिश्राची
  • उमरगा तालुक्यातील मालमत्ता जप्त
 

उमरगा : उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (जिल्हा मॅजिस्ट्रेट) आदेशानुसार, कुप्रसिद्ध गँगलीडर विजय मिश्रा याच्या बेकायदेशीर कमाईतून उभारण्यात आलेली महाराष्ट्रातील तब्बल १०० कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त (कुर्क) करण्यात आली आहे. त्यापैकी उमरगा-लातूर रस्त्यावरील जकेकुर औद्योगिक वसाहत, (लातूर रोड) येथील प्लॉट नंबर बी-१०२(एकूण क्षेत्रफळ ५,०५० चौरस मीटर) या जागेवर ‘लल्ली ॲग्रो इंडस्ट्रीज एल.एल.पी.’नावाचा पल्स (दाल) मिल प्रकल्प सुरू आहे. याची एकूण अंदाजित किंमत सुमारे २०-२५ कोटी रुपये आहे.

(ता. उमरगा) येथील औद्योगिक वसाहती परिसरातील एका दाल मिल कंपनीवर मंगळवारी(दि ७) रोजी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गोपीगंज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यान्वये (मु.अ.सं. १०९/२२), गँगलीडर विजय रामदेव मिश्रा (रा. खपटिहा, जि. प्रयागराज) याच्याविरुद्ध ‘यूपी गँगस्टर ॲक्ट’च्या कलम ३(१) नुसार कारवाई सुरू आहे. विजय मिश्रा याने गुन्हेगारीच्या माध्यमातून आणि बेकायदेशीर मार्गाने अफाट संपत्ती गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल

नातेवाईकांच्या नावावर खरेदी केली होती मालमत्ता

उत्तर प्रदेश येथील जिल्हा मॅजिस्ट्रेट भदोही यांच्या आदेशानुसार, विजय मिश्रा याने गुन्हेगारीच्या पैशातून आपला जावई मुकेश तिवारी आणि मुलगी गरीमा तिवारी (दोघे रा.विलेपार्ले, मुंबई) यांच्या नावावर ही मालमत्ता खरेदी केली होती.जकेकुर औद्योगिक वसाहत, (लातूर रोड) येथील प्लॉट नंबर बी-१०२(एकूण क्षेत्रफळ ५,०५० चौरस मीटर) या जागेवर ‘लल्ली ॲग्रो इंडस्ट्रीज एल.एल.पी.’नावाचा पल्स (दाल) मिल प्रकल्प सुरू आहे. याची एकूण अंदाजित किंमत सुमारे २०-२५ कोटी रुपये आहे.उत्तर प्रदेशातील भदोही (उ.प्र.) च्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ०२ जुलै २०२६ च्या आदेशानुसार यूपी गँगस्टर ॲक्टच्या कलम १४(१) अंतर्गत ही अवाढव्य मालमत्ता जप्त (कुर्क) करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवारी प्रशासनाचा अधिकृत नोटीस बोर्ड (बॅनर) लावून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.या धडक कारवाईमुळे उमरगा औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी कारवाया व अवैध धंद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहेच व बेकायदेशीर मार्गाने मालमत्ता गोळा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

“संबंधित आरोपीवर उत्तर प्रदेशात ‘गुंडा ॲक्ट’ अंतर्गत गंभीर गुन्हे असल्याने, तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या कायदेशीर आदेशाच्या अनुषंगाने, लातूर एमआयडीसी विभागांतर्गत त्याची मालमत्ता सील करण्याचे निर्देश होते. त्यानुसार, उत्तर प्रदेश पोलीस पथक, स्थानिक महसूल प्रशासन (तहसीलदार) आणि आमच्या पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ही मालमत्ता यशस्वीरित्या सील केली आहे.” पोलिस निरीक्षक उमरगा प्रल्हाद सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

Web Title: Up gangster vijay mishra 100 crore property seized maharashtra umarga dal mill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
1

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

‘आरमोरी’ ब्रिटिशकाळातील ‘शस्त्रागार’! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य
2

‘आरमोरी’ ब्रिटिशकाळातील ‘शस्त्रागार’! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य

Uniform Civil Act: मोठी बातमी! UCC लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारची तयारी; ७ सदस्यीय समिती स्थापन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
3

Uniform Civil Act: मोठी बातमी! UCC लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारची तयारी; ७ सदस्यीय समिती स्थापन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध
4

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.