Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संच मान्यतेचे नवे धोरण रद्द करा; शिक्षक संघाचे शिक्षण उपसंचालकांना साकडे

शासनाने नुकताच संच मान्यतेसाठी आवश्यक पटसंख्येच्याबाबत जाचक अटींचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध केलेला असून, त्यानुसार द्वि-शिक्षकी शाळांना किमान ६० पटाची अट घातलेली आहे. तसेच २० पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाईल, त्यापेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये फक्त एकच सेवानिवृत्त शिक्षक कार्यरत असेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2024 | 08:29 AM
संच मान्यतेचे नवे धोरण रद्द करा; शिक्षक संघाचे शिक्षण उपसंचालकांना साकडे
Follow Us
Follow Us:

सांगली : शासनाने नुकताच संच मान्यतेसाठी आवश्यक पटसंख्येच्याबाबत जाचक अटींचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध केलेला असून, त्यानुसार द्वि-शिक्षकी शाळांना किमान ६० पटाची अट घातलेली आहे. तसेच २० पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाईल, त्यापेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये फक्त एकच सेवानिवृत्त शिक्षक कार्यरत असेल. तसेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी सुद्धा पटसंख्येच्या जाचक अटी घातलेल्या असून, त्या एकूणच शिक्षण विरोधी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कमी पटाच्या अनेक शाळा बंद होणार आहेत.

तसेच राज्यभरातून शिक्षकांची अनेक पदे अतिरिक्त होणार आहेत. हा शासन आदेश गोरगरिबांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा शासन आदेश रद्द करा. त्याबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण चर्चा करा, अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे करण्यात आली.

या जुलमी शासन आदेशाबरोबरच राज्यातील सर्वच शाळांना शैक्षणिक वर्षांमध्ये असणाऱ्या सणांच्या सुट्ट्या एकसारख्या असाव्यात याही बाबत किमान कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांच्या कार्यक्षेतील जिल्हा परिषदांना तसे सूचित करावे. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या परंतु त्यानंतर नियमित झालेल्या शिक्षकांचे सदर योजनेमध्ये झालेल्या कपातीच्या रकमा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर वर्ग करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद, उपसंचालक कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय याच दरम्यान प्रलंबित आहेत तरी त्यावरही कार्यवाही व्हावी अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संच मान्यतेच्या नव्या बदलाबाबत सकारात्मक चर्चा करू. सुट्ट्यांची यादी बनवण्यापूर्वी शिक्षणाधिकारी यांना मार्गदर्शन करू तसेच शिक्षकांच्या अंशदान पेन्शन योजनेतील रक्कम वर्ग करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश येताच कार्यवाही करू, असे सांगितले.

यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, शिक्षक बँकेचे संचालक शामगोंडा पाटील, कोल्हापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील, सुधाकर पाटील, महादेव हेगडे, सलीम मुल्ला, आसिफ मुजावर, राजेश निकम, तानाजी कोडग, आनंद उतळे यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Teachers union requesting to deputy director of education for new policy for grant nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • maharashtra
  • sangli news
  • Teachers Recruitment

संबंधित बातम्या

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
1

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
2

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
3

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
4

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.