Alibag News: गटारीचा बेत महागणार! मटणाच्या दराने गाठला १,००० रुपयांचा टप्पा, खवय्यांची चिंता वाढली
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई
आषाढी अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावणात अनेक जण मांसाहार टाळतात किंवा मांसाहाराचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करण्याला खवय्यांमध्ये विशेष महत्त्व आहे. यामुळे या दिवशी मटण, चिकन आणि मासळीला मोठी मागणी असते. (फोटो सौजन्य: Pinterest)
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मटणाच्या दरात वाढ झाली आहे. मटण मिक्ससाठी ग्राहकांना सुमारे ९०० रुपये किलो मोजावे लागत आहेत, तर पिव्वर मटणाचा दर १००० रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे यंदाच्या गटारीला मटणाच्या ताटाचा खर्च वाढणार आहे. वाढलेल्या दरामुळे काही ग्राहकांनी मटणाचे प्रमाण कमी करण्याचा पर्याय निवडला आहे, तर काही जण दराकडे दुर्लक्ष करून गटारीचा बेत कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत.
मटण महागले असले तरी गटारीच्या दिवशी मटणाच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शहरासह ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक करण्यात आली आहे. त्यामुळे गटारीच्या दिवशी रायगड जिल्ह्यात हजारो बोकड फस्त होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मटणाच्या वाढलेल्या दरामुळे काही खवय्ये चिकनकडे वळण्याची शक्यता आहे. तुलनेने परवडणारे असल्याने गटारीच्या दिवशी चिकनलाही मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. चिकनच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होण्याची तयारी सुरू झाली आहे.
मांसाहाराचा बेत करणाऱ्या खवय्यांसाठी मासळीही महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. गटारीच्या पार्श्वभूमीवर मासळी बाजारातही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. समुद्रातील मासळीबरोबरच नदी आणि खाडीतील विविध प्रकारच्या मासळीला मागणी राहण्याची शक्यता आहे.
McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
गटारीच्या निमित्ताने मांसाहाराचा बेत करणाऱ्या खवय्यांना यंदा वाढलेल्या दरांचा सामना करावा लागणार आहे. मटणाचे दर हजार रुपयांवर पोहोचले असले तरी गटारीचा बेत काही थांबणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे “दर वाढले तरी गटारीचा बेत कायम!” अशीच स्थिती बाजारात पाहायला मिळत आहे.






