जेजुरीजवळ भीषण अपघात; ८ जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
बुलढाणा : नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज आला नाही. त्यामुळे क्लिनरच्या बाजूने भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 3 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 7) मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील दुसर बीडजवळ घडली. या अपघातात कल्पना रमेश नासरे (वय 30, रा. नागपूर) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात अथर्व देशमुख (वय 24, रा. वर्धा) आणि विक्की मानसिंग चव्हाण (वय 30, रा. शिवनी, मध्य प्रदेश) किरकोळ जखमी झाले. सदर ट्रॅव्हल्स नागपूरवरून पुणे येथे जात असताना चॅनेज क्र. 312.8 जवळ ट्रेलर क्र. पीबी-06/व्ही-5180 ला लोखंडी सळई घेऊन जात असताना ट्रॅव्हल्सचालक विनोद सुधाकर पखाले (वय 40, रा. वर्धा) याला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स क्लिनर साईडला समोरून धडकली.
हेदेखील वाचा : लग्न समारंभातून परतताना स्कॉर्पिओचा अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी
यामध्ये प्रवास करणाऱ्या कल्पना यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव बोराडे व चालक दिगंबर शिंदे यांनी उपचारासाठी जालना येथे नेले. तसेच अथर्व आणि विक्की किरकोळ जखमी असल्याने घटनास्थळीच डॉ. स्वप्निल सुसर व चालक पडघान यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केला.
33 प्रवासी करत होते प्रवास
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ महामार्ग पोलिसचे विठ्ठल काळूसे, अरुण भुतेकर, संदीप किरके, विजय आंधळे यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान भुसारी, राठोड यांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला सुरक्षित बॅरिकेटिंग करून वाहतूक नियंत्रित केली. तसेच बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण मोहिते, सांगळे यांनी इतर प्रवाशांना पर्यायी वाहनाने पुढील प्रवासासाठी रवाना केले.
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्तीजवळ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू