मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
कळमेश्वर : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली स्कॉर्पिओ उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात लग्न समारंभातून परत येत असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. ही घटना काटोल-कळमेश्वर-नागपूर मार्गावरील डोरली (भिंगारे) शिवारात घडली.
आयएमटी कॉलेजसमोर ही स्कॉर्पिओ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट पुलावरून कोसळली. बुधवारी (दि.4) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये स्कॉर्पिओ चालक रितेश नंदकिशोर गजभिये (वय 22), चंद्रकला गजभिये (वय 45), भावना गजभिये (वय 24, तिघेही रा. भरतवाडा, ता. नागपूर ग्रामीण), अनिता गजभिये (वय 40) व आचल गजभिये (वय 21, दोघीही रा. पारडी, नागपूर) यांचा समावेश असून, श्रीराम गजभिये (वय 48), मनीष गजभिये (वय 18), नंदकिशोर गजभिये (वय 50) व चुटकी (वय 5, सर्व रा. भरतवाडा, ता. नागपूर ग्रामीण) अशी किरकोळ जखमींची नावे आहे.
सर्व जण एकाच कुटुंबाचे सदस्य असून, ते बुधवारी काटोल शहरात लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर ते स्कॉर्पिओने (एमएच-49/बी-2744) काटोलहून कळमेश्वर मार्गे नागपूरला जात होते. दरम्यान, डोरली ता. काटोल शिवारात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली स्कॉर्पिओ उड्डाणुलावरून खाली कोसळली. यात पाच जण गंभीर, तर चौघे किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुणालयात आणले. सर्वांवर प्रथमोपचार केल्यानंतर गंभीर जखमींना नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.