Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पुन्हा कोयत्यांची दहशत; सात महिन्यांत इतक्या घटना

ही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत देखील तोडफोडची घटना घडली. सातत्याने या घटना शहरात घडत असल्याने सर्व सामान्य पुणेकर दहशतीच्या छायेत आहेत. त्यात वाहनांचे नुकसानाचा भुर्दंड देखील सोसावा लागत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2024 | 11:43 AM
पुण्यात पुन्हा कोयत्यांची दहशत; सात महिन्यांत इतक्या घटना
Follow Us
Follow Us:

अक्षय फाटक

पुणे:  पुणेकरांना दहशतमुक्त वातावरण देण्याचा पुणे पोलिसांचा ‘दावा’ फोल ठरवत पुन्हा कोयतेधाऱ्यांनी दहशत माजवण्यास सुरूवात केली आहे. अचानक चार-दोघांचे टोळके हुल्लडबाजी अन् आरडाओरडा करत शांत परिसराला क्षणात दहशतीचे स्वरूप आणत हवेत कोयते फिरवून सर्वसामान्य पुणेकरांच्या वाहनांचे खळखट्याक करत आहेत. वाहनांसोबतच किरकोळ वादातून हे टोळके दुकानांची तोडफोड करत आहेत. गेल्या सात महिन्यात तोडफोडीच्या 67  घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यात परिमंडळ चार व पाचमध्ये तोडफोडीच्या सर्वाधिक घटना घडल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

शांतता प्रिय पुण्याची ओळख बदलत्या काळात वाढत्या गुन्हेगारांमुळे वेशीवर टांगली गेली आहे. टवाळखोर तसेच नव्याने गुन्हेगारीत आलेल्या तरुणांकडून गुन्हेगारीची दहशत कायम ठेवली जात आहे. तत्पुर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार घेताच या वाढीव गुन्हेगारांना सज्जड दम दिला होता. परंतु, गुन्हेगारांनी आपली दहशत कायम ठेवल्याचे पाहायला मिळत असून, किरकोळ कारण, जुने वाद व दहशतीसाठी वाहनांची तोडफोड सुरू आहे.

येरवडा परिसरात ‘मर्डर’ झालेल्या तरुणाच्या चाहत्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास गोंधळ घालत दुचाकी व रिक्षांची तोडफोड केली. अचानक झालेल्या याप्रकाराने दहशतीचे वातावरण पसरले. त्यापुर्वीच्या रात्री कोयता गँगने लष्कर परिसरात वाईन शॉपचीही तोडफोड केली. यासोबतच काही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत देखील तोडफोडची घटना घडली. सातत्याने या घटना शहरात घडत असल्याने सर्व सामान्य पुणेकर दहशतीच्या छायेत आहेत. त्यात वाहनांचे नुकसानाचा भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. पुणेकर झोपेत देखील या घटनांमुळे बेचैन आहेत. वाहन चोरी, तोडफोड अशा मानसिक तणावातून पुणेकर जात असताना या घटनांना लगाम लावण्यात पुणे पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. तर पुणे पुन्हा कोयता गँगच्या दहशतीत वावरत आहे.

परिमंडळनुसार तोडफोडीच्या घटना

परिमंडळ एकम मध्ये चार, परिमंडळ दोन मध्ये आठ परिमंडळ तीन मध्ये 12, परिमंडळ चारमध्ये 15, परिमंडळ पाचमध्ये 28 तोडफोडीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीनांचा सहभाग

वाहन तोडफोडप्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग कायम आहे. शहरात गेल्या सात महिन्यात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये ५५ अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले आहे. यासोबतच सव्वा दोनशे जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील अनेकजन फरार आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही.

परिमंडळ चार व पाचमध्ये सर्वाधिक घटना

शहराचा उपनगर व वाढत असलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिमंडळ चार व पाचमध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यातही येरवडा भागात तब्बल १० त्याखाली हडपसर व कोंढवा परिसरात प्रत्येकी ८ घटना घडल्या आहेत. वानवडी, पर्वती यामध्ये देखील तोडफोडीच्या घटनांची संख्या मोठी आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त  अमितेश कुमार म्हणाले की,  “वाहन तोडफोड सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. परिसरात पेट्रोलिंग व गस्त देखील वाढवली आहे. आरोपीविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. यापुढे कोणतीही घटना घडणार यासाठी आम्ही दक्ष आहोत.”

Web Title: Terror of koyta gang in pune so many incidents happens in seven months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 11:31 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Police News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.