
पुणे : राज्यामध्ये सध्या गुंडागिरी करणाऱ्या गुंडांचे प्रस्त वाढले आहे. अनेक गुन्हेगारांच्या व खूनाच्या घटना समोर येत आहे. मात्र कारागृहामध्ये असलेले गुंड कैदी येथे देखील दहशद माजवत आहेत. येरवडा कारागृहातील कैदी गुंडांच्या दहशदीचे प्रमाण वाढले आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याची बाब समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहामध्ये एका कैदाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता कैद्यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मध्ये ही घटना आज (दि.15) सकाळी घडली. कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपी विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. किरकोळ कारणावरून भांडण करत या दोघांनी 10 इतर गुंडाना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली तर उजवा हाथ फ्रॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.