
Thackeray Brother Alliance Announcement:
Thackeray Brother Alliance Announcement: राज्याच्या राजकारणतील बहुप्रतिक्षित शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची आज अधिकृत घोषणा होणार आहे. आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या युतीची घोषणा करतील. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या युतीकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्येही जागावाटपांची माहिती आण निवडणुकीसंदर्भात या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाईल. (Thackeray Brother Alliance Announcement)
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तब्बल २० ते २२ वर्षांनंतर आज ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत. राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णयही ठाकरे बंधुंनी घेतला आहे. दुपारी १२ वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसह जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनसे आणि शिवसेना युतीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही समोर आला आहे. यानुसार ठाकरे गटाला १४५ ते १५० जागा आणि मनसेला साधारणपणे ६५ ते ७० जागा सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादीला १०-१२ जागा मिळण्या शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीची ज्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. २०१९ मध्ये याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अजूनही युतीत आहोत अशी घोषणा केली होती. पण २०१९ च्याच विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली. त्याच हॉटेलमध्ये आज तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत.
दरम्यान, ठाकरे-मनसेच्या युतीच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास एकत्रित अभिवादन करणार आहेत. पत्रकार परिषदेपूर्वीसकाळी 11 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करतील, त्यानंतर ब्ल्यू सी हॉटेलकडे रवाना होतील, अशीही माहिती आहे.