मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रेतेचा (MLA Disqualification Case) निर्णय शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अनेकांनी नार्वेक[blurb content=””]र यांच्या पक्षपातीपणावर जोरदार टीका केली असून शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. आमदार अपात्रतेच्या निर्णयावर देखील राऊत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी नार्वेकरांच्या निकालावर टीका केली. राऊत म्हणाले, – राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केले. ते शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकीली करावी असे ते निकालपत्राचे वाचन करत होते. आम्ही त्यांच्यासमोर प्रत्येक कागदपत्र ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची केलेली निवड चुकीची असल्याचे सांगून देखील त्यांची निवड योग्य ठरवण्यात आली. आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ. कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. निर्णय खरा की खोटा हे नार्वेकरांनी स्वतःला विचारावं असा टोला संजय राऊत लगावला.
नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिवसेना जिथे जाईल तिथे पंतप्रधान जात आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच “आता हे काळाराम मंदिरामध्ये जाणार आहेत असे कळाले, पण ह्यांनी हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरच्या मंदिरात यावं” असे आव्हान संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना दिले. तसेच आम्ही सगळे लवकरच अयोध्येला जाणार आहोत. आम्हाला आमंत्रणाची गरज नाही. आम्ही लवकरच रामाचे दर्शन घेणार असल्याचे देखील खासदार राऊत यांनी सांगितले.
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही संपली अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती. आम्ही विचारांचा वारसा पुढे नेत आहोत. श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदेंना मुलगा म्हणूनच मत मागितला ना. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले पण शिवसेना कायम उभी राहली आणि राहिल. शिवसेना कोणाला गिळता येणार नाही. तुम्ही डरपोक आहात म्हणून तुम्ही घाबरून पक्ष सोडला” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराणेशाहीच्या वक्तव्यावर दिली.
शिवसेना (शिंदे गट) टोला लगावताना “चोरांना चोर नाही तर हरिश्चंद्र बोलायचं का? हरामखोरांना हरिश्चंद्र बोलायची महाराष्ट्रात पद्धत नाही, आम्ही हरिश्चंद्राचे आणि श्री रामाचे भक्त आहोत. आम्ही सत्यवचनी आहोत आणि चोराला चोर आणि ढोंगी म्हणायची ताकद महाराष्ट्रात आहे” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.