मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्षणाक्षणाला येथे परिस्थिती रंगतदार होत आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांच्या नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
[read_also content=”लोकांच्या आशीर्वादाने आपण पुन्हा सत्तेत येऊ, जयंत पाटील यांना विश्वास https://www.navarashtra.com/maharashtra/we-will-come-back-to-power-from-the-blessings-of-people-jayant-patil-336126.html”]
दरम्यान, आज भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गट सावध पावलं टाकताना दिसत आहेत. संदीप नाईक हे लटके यांचे अत्यंत जवळचे तसेच निकटवर्तीय समजले जातात. कोणत्याही कारणास्तव दगाफटका होऊ नये, यामुळे संदीप नाईक यांच्या अर्ज दाखल करण्यात आला आहे. लटके यांचा अर्ज कुठल्या कारणास्तव अवैध ठरला, तर पोटनिवडणुकीतून बाहेर होण्याची नामुष्की टाळण्यासाठी ठाकरेंनी ‘प्लॅन बी’ अवलंबला आहे. खबरदारी म्हणून संदीप राजू नाईक (Sandeep Naik) यांचाही डमी उमेदवारी अर्ज ठाकरेंतर्फे दाखल करण्यात आला आहे.