
मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर ठाकरे गटाचं आंदोलन
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील (Mumbai Nashik Agra Highway) खड्ड्यांचा मुद्दा गाजत आहे. खरं तर मुंबई ते नाशिक हे अंतर पार करण्यासाठी जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. पण मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मुंबई ते नाशिक प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे वाहन चालक देखील वैतागले आहेत. ऐवढंच नाही तर मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमधून गाडी चालवताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
हेदेखील वाचा – मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता; तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ
याप्रकरणी आता ठाकरे गटाने (Thackrey Group) आक्रमक भुमिका घेतली आहे. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ठाकरे गटाने मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. खड्ड्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज ठाकरे गटाने मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर आंदोलन केलं. घोटी टोल नाका परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरील टोलनाका अडवून धरला आणि खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्याची मागणी केली. या आंदोलनात माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे गटाने टोलनाक्यावरून विना टोल वाहने सोडली. त्यामुळे काही वेळासाठी या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
हेदेखील वाचा – ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! डॉक्टरचे कारनामे उघडकीस; व्हिडीओ व्हायरल
याबाबत माजी आमदार निर्मला गावित यांनी सांगितलं की, मुंबई ते नाशिक हे अंतर पार करण्यासाठी जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. पण मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मुंबई ते नाशिक प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे, मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत.
माजी आमदार निर्मला गावित यांनी पुढं सांगितलं की, आमच्या या आंदोलनात माजी आमदार वसंत गिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विना टोल गाड्या सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचं देखील काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे अपघातांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आता मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर घोटी तसेच इगतपुरी परिसराधील उड्डाणपुलाचं लवकरात लवकर पूर्ण करावं, ज्यामुळे या अपघाताची संख्या कमी होईल.