फोटो सौजन्य -iStock
मुबंईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत आणि तलावांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईत 10 टक्के पाणीकपाती लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
हेदेखील वाचा – मुंबई उपनगरात दमदार पावसाची हजेरी; रस्ते जलमय; वाहतूक सेवा विस्कळित; नागरिकांचे हाल
वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र जून महिन्यात पाऊस लांबल्याने या जलाशयांतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहरात 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपातीचा निर्णय लागू केला होता. मात्र पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपतीची तलावर लटकत आहे. मात्रा आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावंमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या तलावांमधील पाणीसाठ्याने 50 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होऊन मुंबईत सुरु असणारी 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा – मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवामान अंदाज
मुंबईत सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये एकूण 53.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 200 दिवस पुरेल इतका आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास या जलाशयांमधील पाणीसाठ्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच मुंबई महानगर पालिका मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करू शकते. याबबात लवकरच जलविभागाची आयुक्तांसोबत बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पाणीकपात रद्द करण्याच्या निर्णयबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वारणा धरण क्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.






