सोलापूरत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का (फोटो- टीम नवराष्ट्र)
Maharashtra Vidhansabha Nivadnuk: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात 288 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मात्र महाविकास आघाडी एकत्रित लढत असताना सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कॉँग्रेसपक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्राणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
शरद कोली हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत. प्राणिती शिंदे या भाजपच्या बी टीम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासदार प्राणिती शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्या भाजपचा प्रचार करतात. शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असल्याचे कोळी यांनी म्हटले आहे. यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही असे कोळी म्हणाले.
शरद कोळी यांनी शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापल्याची टीका केली. भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना जिंकवण्यासाठी खासदार प्राणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. अमर पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर कॉँग्रेसने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान कॉँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये वातावरण तापले आहे.
सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?
आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात चांगले वातावरण आहे. ते शांत, चांगले आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे उमेदवार आहेत. उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली. खासदार प्राणिती शिंदे म्हणाल्या हा कॉँग्रेसचा मतदारसंघ आहे. बालेकिल्ला आहे. या मतदारसंघाने राज्याचा मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आम्ही आघाडीचा धर्म पाळला आहे. एबी फॉर्म दिला नाही. या जागेवरून काही मतभेद झाले होते. मात्र आम्ही धर्मराज काडदी यांच्या मागे आहोत.
हेही वाचा: Maharashtra Assembly Election Voting Live 2024 : दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.अशातच अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाल्यामुळे नागरिकांच्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहे. परिणामी मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 32 टक्के मतदान झाले आहे. यावेळी राजकारण्यांपासून ते बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्सपर्यंत सर्वांनीही मतदान केले आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.