
Thane Municipal Corporation: ठाणे पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चुरस; कोणाची लागणार वर्णी?
Thane Municipal Corporation: ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्व पक्षांनी जोरदार फिल्डिंग लागली असून त्यासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती वर १६ जणांच्या सदस्यांची निवड ही पक्षीय संख्याबळानुसार होणार असून तेथे कोणाची नियुक्ती होणार? याबाबत नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या २० फेब्रुवारीला ठाणे महापालिकेची महासभा आयोजित केली आहे. त्यामध्ये १० स्वीकृत नगरसेवक तसेच १६ स्थायी समिती सदस्य आणि अन्य प्रभाग समिती सदस्यांची निवड होणार आहे. महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. ६ नगरसेवक शिवसेनेचे, २ भाजपचे, १ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा तर १ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा असे एकूण दहा नगरसेवक निवडले जाणार आहेत.
तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव व युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे देखील ठाणे पालिकेत निवडणूक लढवून नगरसेवक होण्यास इच्छुक होते. तथापि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना
अधिकाधिक संधी मिळावी. या हेतूने अन्य कार्यक्षम उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले, त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी आशुतोष म्हस्के तसेच पूर्वेश सरनाईक यांचा विचार केला जातो का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
या निकषांमध्ये पाच नगरसेवक असलेला एमआयएमचा पक्ष तसेच केवळ एक नगरसेवक असलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष बसत नसल्यामुळे एमआयएम आणि उबाठा या दोघाही पक्षांना स्वीकृत नगरसेवक पदापासून वंचित राहावे लागणार आहे. शिंदे सेनेला स्वीकृत नगरसेवक पदासाठी सहा उमेदवार देता येणार आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात
माजी महापौर अशोक वैती यांचे नाव प्राधान्याने घेतले जात असून एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासातील समजले जाणारे अशोक वैतींना स्वीकृत ठाण्यातील शिंदे यांच्या नगरसेवक पदी पाठवणे पालिकेचा कारभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशोक वैतींबाबत बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेतात याकडे देखील ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. तथापि, याचबरोबर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष मस्के हे देखील कोपरीतून नगरसेवक पदासाठी इच्छुक होते.