ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : किम्स हॉस्पिटलने आज ठाणे शहरात पहिल्या AI – इंटी ग्रेटेड 5G स्मार्ट अॅम्ब्युलन्स अगळ्या वेगळ्या स्वरूपात प्रस्तुत केली, ही अध्यावत अॅम्ब्युलन्स AI तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णावर हरक्षणी देखरेख ठेऊन आणि अखंडित 5G कनेक्टिव्हिटी पुरवीत हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीच्या अतिदक्षात देखभाली साठी सुसज्ज आहे ही यंत्रणा इमर्जन्सी टीम्सना अॅम्ब्युलन्समधील कर्मचारीवर्गाशी संवाद साधण्याची सुविधा पुरविते, आकडेवारीचा प्रत्येक क्षणी फेरआढावा घेऊ देते व त्यानुसार एमर्जन्सी वे सज्ज ठेव शकते, ज्यातून ‘गोल्डन अवर’चा जास्तीत जास्त फायदा घेतला जातो.
ज्या रुग्णांना अचानक आरोग्याविषयक काही गंभीर समस्या उद्भभवली तर त्यांनी 02244123500 या नंबर वर संपर्क साधल्यास ही अध्यावत अॅम्ब्युलन्स त्यांना उपलब्ध होऊ शकते, आणि जिपीएस प्रणाली मुळे ती कुठपर्यंत पोहचली याची माहिती मिळू शकते, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वीच रुग्णावर AI इंटींग्रेटेड मुळे उपचार होऊ शकतात.
या सेवेच्या शुभारंभामुळे किम्स हॉस्पिटल्स संपूर्णपणे AI-इंटिग्रेटेड 5G स्मार्ट म्ब्युलन्स सेवा सुरू करणारी ठाणे परिसरातील पहिली संस्था ठरली आहे, ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज आपत्कालीन औषधोपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून तिने आपने स्थान निश्चित केले आहे. किम्स हॉस्पिटल्स हे भारताच्या काही अग्रगण्य मल्टि-स्पेशलिटी हेल्थकेअर नेटवर्क्सपैकी एक आहे, जे आपल्या चिकित्सात्मक सर्वोत्कृष्टतेसाठी आणि रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीसाठी सुपरिचित आहे.
30 हून अधिक मेडिकल स्पेशलिटीज आणि वेगवेगळ्या शहरांत पसरलेले कार्यक्षेत्र यांच्या साथीने किम्स आरोग्यसेवा क्षेत्रात नवसंकल्पना राबविण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. हॉस्पिटल अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाची सहृदयतेने केलेल्या देखभालीशी सांगड घालते, जेणेकरून दर्जेदार आरोग्यसेवा सहज, वाजवी दरात उपलब्ध व्हावी व परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी असावी.अशी माहिती आज किम्स हॉस्पिटल्स च्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.