Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : बांबूच्या चटईतून बाप्पाची आरास; पर्यावरणपूरक सजावटीतून दिला संदेश

गणेशोत्सवात गणपतीची आरास करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात यावा यासाठी प्रशासनाकडून कायमच जनजागृती केली जाते. तसंच प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंगांचा गैरवापर टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 03:57 PM
Thane News :  बांबूच्या चटईतून बाप्पाची आरास; पर्यावरणपूरक सजावटीतून दिला संदेश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्तिभाव नव्हे तर, संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवुन भाविकांसाठी निसर्गस्नेही मखराचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत.

ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आर्टसच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती बाप्पाची मखर तयार केली जात आहेत. या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनिषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटींगपासून फिटींगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेलं आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविधारंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो.

यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे, बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पाने-फुले-मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे.

‘शक्तिपीठ’ला इथं मिळतोय चांगला पाठिंबा; शेतकरी स्वेच्छेने देताहेत जमिनी

पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहेत. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगांच्या आराशीत, ‘देसले’ कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उद्बोधक उदाहरण ठरले आहे.”सण साजरा करताना निसर्गाचं भान ठेवणं हीच खरी संस्कृती आहे. ही आरास केवळ सजावट नाही, तर पुढच्या पिढीसाठी पर्यावरण बचावाचा संदेश आहे,”

धरण क्षेत्रात पावसाची उघडीप तरीही पुराचा धोका कायम; कोल्हापूरची परिस्थिती नेमकी काय?

Web Title: Thane news bappas decoration made from bamboo mat a message of eco friendly decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
1

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण
2

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण

Raigad News: नगरपरिषदांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात, २ डिसेंबर रोजी होणार मतदान
3

Raigad News: नगरपरिषदांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात, २ डिसेंबर रोजी होणार मतदान

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा
4

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.