Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवध्वजाचं अनावरण; 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावर फडकवला ध्वज

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य "शिवध्वज' डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 07, 2025 | 04:00 PM
Thane News : जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवध्वजाचं अनावरण; 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावर फडकवला ध्वज
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे, स्नेहा जाधव,काकडे : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य “शिवध्वज’ डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे. दरम्यान, या प्रसंगी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी , आजचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणारा आहे. कारण, आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड झुगारून रयतेचे राज्य स्थापन केले, असे प्रतिपादन केले.

कळवा पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसेच विचारांचा जागर व्हावा, या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने सुमारे 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावर 20×30 फूट आकारमानाचा शिवध्वज फडकत ठेवण्याची संकल्पना डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आजच्याच दिवशी जगात सर्वात आधी रयतेचे राज्य स्थापन झाले. या देशात जुलमी राजवटीविरुद्ध प्रथमच बंड करून मराठी अस्मिता जगाला दाखवून देणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी कर्मकांडाला दूर सारले होते. कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जगासमोर मांडले होते.

व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला नमविले. या व्हिएतनामनेही आपल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांचाच आदर्श समोर ठेवला होता अन् त्याची कबुली आजही ते देत आहेत. महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या राज्याला नख लावण्याचे काम खंडोजी खोपडे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केले. मात्र, त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहास सुभेदार तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते आणि जीवाजी महाले यांचा लिहिला गेला. आपण या शूरवीरांचे वारस आहोत. गद्दारांना या मातीत ठेचल्याशिवाय हा महाराष्ट्र कधी शांत बसलेला नाही. गद्दारी करणारे लोक विकासासाठी नाही स्वयंविकासासाठी गेले आहेत. त्यामुळे विकासाचा टेंभा कुणी मिरवू नका. इथे दिसणारा विकास 15 वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे.

इथे उभारलेला भगवा हा कोण्या पक्षाची नाही तर मराठी अस्मितेची, त्यागाची आणि शौर्याची निशाणी आहे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पुढाकारातून दुचाकीची शिवरॅली काढण्यात आली. कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरूवात करण्यात आली. या रॅलीत शेकडो शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवाच्या घोषणा देत ही रॅली कळवा नाका, कळवा परिसर अशी फिरून छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे विसर्जित करण्यात आली.

या लोकार्पण सोहळ्यास अरविंद मोरे, मा. नगरसेविका वर्षा मोरे, मा. नगरसेवक राजेश खारकर , नताशा आव्हाड, अभिजित पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस, राजेश कदम, ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, व्यापारी सेल अध्यक्ष संजीव दत्ता, अंकुश मढवी, रचना वैद्य, समीर नेटके, विशांत गायकवाड, ज्ञानेश्वर राजपंखे, व्यापारी सेल अध्यक्ष संजीव दत्ता, शिवा ठाकूर, महेश भाग्यवंत, हिरामण गंगावासी, पद्माकर पाटील, शिवा यादव, दिगंबर गरुड, एकनाथ जाधव, जयेश पाटील, राहुल पाटील, इक्बाल शेख, फुलबानो पटेल, दिलीप उपाडे, विलास पाटील, विजय बागल विजय पवार, सुभाष यादव, रोहिदास पाटील, राजु शिंदे, मनिषा पाटील, साबिया खान आदी उपस्थित होते.

Web Title: Thane news jitendra awhad unveils shiv dhwaja flag hoisted on 52 feet high iron pillar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • jitendra avhad
  • Nationalist Congress Party
  • Thane news

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
2

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
4

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.