Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत शाळांना सील ठोका; संजय केळकर यांची मागणी

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या अनधिकृत शाळांवर करवाई व्हायलाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 04, 2025 | 12:26 PM
Thane News : विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत शाळांना सील ठोका; संजय केळकर यांची मागणी
Follow Us
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव, काकडे :  मुंब्रा आणि दिव्यात ८१ अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त तीन शाळांवर कारवाई करण्यात आली. या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने या शाळांचे पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. या शाळांवर ठोस कारवाई करण्याची गरज असून त्या सील कराव्यात, अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

ठाणे, मुंब्रा, दिवा भागात अनधिकृत शाळांची संख्या ८१ झाली असून त्यातील ७० शाळा एकट्या दिव्यात आहेत. गेल्या २१ महिन्यांत दिव्यात ३९ अनधिकृत शाळांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करूनही फक्त तीन शाळांवरच कारवाई करण्यात आली आहे. या शाळांना ६५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून तो अद्याप जमा करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर येथील अधिकृत शाळांनी बंद पुकारला होता तसेच आमदार केळकर यांना भेटून भूमिका मांडली होती. अनधिकृत शाळांमुळे पालकांचे नुकसान तर होतेच पण विद्यार्थ्यांचेही भविष्यात मोठे नुकसान होणार असल्याने श्री.केळकर यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अनधिकृत शाळा अद्याप सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्या-त्या यंत्रणा अशा शाळांवर कारवाईची प्रक्रिया करत असतात, पण संगनमतामुळे या शाळा अद्याप सुरूच आहेत, किंबहुना आणखी वाढत असल्याची खंत श्री.केळकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत फक्त तीनच शाळांवर कारवाई करण्यात आल्याने झारीतले शुक्राचार्य कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळांची पाणी आणि वीज जोडणी तोडून त्या सील करण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टळेल, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली आहे.

Thane News : मनपाहद्दीत 124 अनधिकृत बांधकाम; अतिक्रमण विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वास्तूंचे जतन करण्याची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मगावी राज्य सरकारने भव्य स्मारकासाठी मोठी तरतूद केली आहे. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यांनी सुरू केलेली अन्नछत्रे, बांधलेली मंदिरे, पूल, घाट, किल्ले, वाडे आणि विहिरी या वास्तूंची दुरावस्था झाली असून त्यांची दुरुस्ती करावी, त्या वास्तू जतन कराव्यात, अशी मागणी देखील आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

 

Thane News : एसटी आगारात खड्यांचं साम्राज्य; आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासनाची डोळेझाक

Web Title: Thane news seal unauthorized schools that are harming students sanjay kelkar demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news
  • Unauthorized Schools

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.