ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगारात खड्याचं साम्राज्य झालं असून, प्रशासनाच दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे्. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील अतिशय जुनं असं रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगाराकडे प्रशासनाच दुर्लक्ष असून रोजच्या हजारो प्रवासी अनेक समस्यांना सामोरं जात आहेत. ठाणे जिल्हा आणी इतर प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाच असलेल हे आगार अक्षरशः समस्येंनी ग्रासलं आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रवासी आणी वाहतूक संस्थेकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागूनही समस्येच निराकारण न झाल्याने नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धाव घेतली आहे.
शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकारींनी एसटी आगाराची पहाणी केली असता एसटी आगार अक्षरशः खड्यात गेल्याच चित्र दिसुन आलं आहे. तसेच या खड्यांमूळे प्रवासी एसटीतून उतरताना बराच वेळा पडले आहेत. खड्यातून एसटी जाताना प्रवाशांच्या चिखल उडत असल्याच निदर्शनास आलं आहे. एवढच नाहीतर आगाराची परिस्थिती जीर्ण झाली असून कधीही आपत्ती येवू शकते अशी परिस्थिती आहे. एसटीने प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासन डोळे झाक कसं काय करु शकतं असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
सदर घटना लक्षात घेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तुषार रसाळ ,नौपाडा विभागप्रमुख तथा ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश शिके, महागिरीचे विभागप्रमुख संजय भोई, उपविभागप्रमुख नौपाडा सदानंद गोवर्धने, नोपाडा विभाग सचिव जगदीश निकम, आदित्य भानूशाली माथाडी कामगार सेना, कार्याध्यक्ष राजू शिंदे, उल्हास शिवनेकर, जगन्नाथ तावडे, शाखाप्रमुख संतोष निकम, शाखाप्रमुख जितेंद्र भुवड, शाखाप्रमुख राजू म्हात्रे, उपविभागप्रमुख तसेच समस्त शिवसैनिकांनी मिळून प्रशासनाला गुरूवार 3 जुलैला भेटून समस्येंच निवेदन दिलं आहे. तसंच लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी केली. ह्या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच ठाणे जिल्हा प्रवासी आणी वाहतूक संस्था ठाणेकरां सोबत जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.