ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढत चालला आहे. सततच्या या त्रासाला कंटाळेले नागरिक प्रशासनाने दखल घ्यावी याकरिता आता रस्त्यावर उतरले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
ठाणे शहर युवा काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या उपस्थितीमध्ये ओवाळा माजिवडा 146चे युवक अध्यक्ष श्रीकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. विशेष म्हणजे, या आंदोलनात खड्डे फक्त दाखवले गेले नाहीत, तर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून प्रत्यक्ष खड्डे बुजवले आहेत.
घोडबंदर रोड हा ठाण्याच्या मुख्य मार्गांपैकी एक असून या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे येत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी शरद पवारओबीसी सेल ठाणे जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी राष्ट्रवादी शरद पवारठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम राष्ट्रवादी 188 स्टेशन विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ जाधव आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्ते यांनी या समस्येला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. यावेळी रस्त्यावर फलक लावून आणि घोषणा देत त्यांनी जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा जोरदारपणे मांडला.
आंदोलनावेळी श्रीकांत भोईर यांनी सांगितले की, “जनतेचे आयुष्य धोक्यात घालून प्रशासन डोळेझाक करत आहे. आम्ही राजकारणासाठी नव्हे, तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. खड्डे बुजवणे ही आमची जबाबदारी नसली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हे काम करत आहोत.”
या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सरकारला जाग येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे झालेल्या आंदोलनामुळे घोडबंदर रोडवरील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.