
'तू मारल्यासारखे कर, मी...'! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा
भाजपने केले होते बदलापुर प्रकरणातील आरोपीला नगरसेवक
टीकेची झोड उठताच घेतला राजीनामा
तुषार आपटे झालेला स्वीकृत नगरसेवक
Badlapur Case Tushar Apte: काल भाजपने बदलापूर लैंगिक प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. मात्र त्यानंतर भाजपवर सर्व बाजूने टीकेची झोड उठली. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर अखेर तुषार आपटे या आरोपीने स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला त्रास होऊ नये यासाठी त्याने राजीनामा देताना म्हटल्याचे समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांनी त्याचा राजीनामा घेतल्याचे समोर आले आहे.
तुषार आपटे हा बदलापूर प्रकरणात सहआरोपी आहे. भाजपने बदलापूरमध्ये त्याला स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. त्यानंतर भाजपवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला. अखेर आज सहआरोपी तुषार आपटे यांनी शाळेची बदनामी होऊ नये तसेच भाजपला त्रास होऊ नये असे कारण देत आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार आपटेचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान भाजपने अखेर बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा राजीनामा घेतला आहे.
राऊतां केलेली भाजपवर टीका
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक मुलींवर आत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपवर टीका सुरू झाली आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, “बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर बदलापूर पेटला होता. राजकारण्यांना तिकडे पाऊल ठेवू दिले गेले नाही. पीडित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार घेऊ नये, यासाठी पोलिसांकडून दबाव टाकण्यात आला, अशी तक्रार समोर आली आहे.”
“आम्हाला वाटले होते की या प्रकरणातील संबंधित व्यक्ती जेलमध्ये आहेत आणि रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून नगरसेवक बनवून थेट पालिकेत नेत आहेत. तुषार आपटे यांना दिलेले पद हे लैंगिक अत्याचार प्रकरणात इनाम म्हणून दिले आहे का? त्यांच्यावर खटला प्रलंबित आहे. आता मुख्यमंत्री त्यांना देखील क्लीनचिट देणार का? तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकत आहात. त्यांनी केलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन तुम्ही असा व्यभिचार झाकण्याचा प्रयत्न करत आहात का?”