कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्ध अनुयायांचे साखळी उपोषण
कल्याण : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी दिव्यज्ञान प्राप्ती झाली, याची साक्ष म्हणजे बोधीवृक्ष. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावा अशी मागणी बौद्ध अनुयायांकडून केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर बोधीगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कल्याणमध्ये गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. येत्या 8 मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ बदलापूर परिसरातील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भंते प्रिय रत्न यांनी केले आहे.
कल्याण वालधूनी परिसरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने भंते गौतम महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली 1 मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावे या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. या प्रकणी केंद्र आणि बिहार राज्य सरकारने दखल घ्यावी. मंदिर आणि मशीदमध्ये त्या त्या धर्माच्या लोकांना ट्रस्टी नेमले जाते. महाबोधी महाविहारातही बौद्धांची नेमणूक करण्यात यावी. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे . या मागणीसाठी येत्या 8 मार्च रोजी कल्याणच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या माेर्चात समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भंते प्रिय रत्न यांनी केले आहे.
भगवान गौतम बुद्धांनी जिथे दिव्यज्ञान प्राप्ती मिळवली त्या ते बिहारमधील गया येथील बोधीवृक्ष बौध समाजाच्या हाती यायला हवं. देशातील जितके ही धार्मिक स्थळं आहेत ती देवळं, चर्च या सगळ्याला त्या त्या धर्माचे विश्वस्त असतात. मात्र गौैतम बुद्धांचे जे विहाराला बौद्ध धर्निय विश्वस्त नाही. या ठिकाणी बोधीगया टेम्पल ऍक्ट 1949 असल्यामुळे बौद्धमहासभेने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि बिहार सरकारने एकत्र येत यावर सुवर्णमध्य हा कायदा हटविण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची पुर्तता होण्यासाठी आणि सकरारने दखल घ्यावी म्हणून बौद्ध अनुयायांनी साखळी उपोषण केलं आहे.