Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश

ठाणे शहरातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, कल्याण डोंबिवली क्षेत्रातील एमआयडीसी क्षेत्र आणि वसई विरार एमआयडीसी क्षेत्र या भागांचा पुनर्विकास हा एमआयडीसीच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवून करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 09:45 PM
‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश
Follow Us
Follow Us:

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचा निर्णय
क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट’ घोषित करणार
ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे: ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी क्लस्टर योजनेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी ही योजना महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे हस्तातंरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ठाणे एमआयडीसीची ६०.७२ हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसन प्रकल्पासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे निर्देश देतानाच ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना ‘व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट’ घोषित करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे समूह विकास प्रकल्प आणि एमआयडीसीबाबत आढावा घेतला. ठाणे समूह विकास प्रकल्प आता ‘महाप्रीत’ ऐवजी एमएसआरडीसीकडून करण्यात येणार असल्याचे सांगत या बदलासाठी आवश्यक असणारी हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आणि सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

📍 #ठाणे | ठाणे समुह पुनर्विकास प्रकल्प आणि एमआयडीसीशी संबंधित विषयाबाबत आज एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत या कामाचा सर्वंकष आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा… pic.twitter.com/NTxAt2qKnu — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2026

ठाणे समूह विकास प्रकल्प हा देशातील पहिला भव्य समूह विकास प्रकल्प असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे शहराचा हा समूह विकास प्रकल्प नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळवून देणारा ठरेल. हा केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प नसून, नागरिकांचे जीवनमान उंचावणारा समूह विकास प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला

एमआयडीसी क्षेत्रातील ६०.८५ हेक्टर जमीन क्लस्टर योजनेसाठी देण्यास एमआयडीसीने मंजुरी दिली होती. त्याबदल्यात त्यांना १२.५ टक्के विकसित जमीन परत मिळणार होती. मात्र त्यातील काही भूखंडांचे वाटप झाले असल्याने भूखंडधारकांची मंजुरी घेणे, आदिवासी पुनर्वसनासाठी राखीव ७३ भूखंडाचा प्रश्न निकाली काढणे, स्टॉलधारक आणि इतर प्रभावित घटकांना पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित करण्यासह अन्य विषय प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्याने उद्योग विभागाची मंजुरी घेऊन येत्या आठवड्याभरात एमआयडीसी आणि टीएमसी यांच्यात त्रिपक्षीय करार पूर्ण करून ही हस्तांतरण प्रकिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योग विभागाला दिले.

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

ठाणे शहरातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, कल्याण डोंबिवली क्षेत्रातील एमआयडीसी क्षेत्र आणि वसई विरार एमआयडीसी क्षेत्र या भागांचा पुनर्विकास हा एमआयडीसीच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवून करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र अद्यापही या योजनांना अपेक्षित गती मिळालेली नाही त्यामुळे या क्षेत्रातील धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी या प्रकल्पांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ठाणे क्लस्टर योजनेप्रमाणे शासनाला १२.०५ टक्के जमीन देऊन या पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. क्लस्टर पुनर्विकास योजना राबवताना पुनर्वसनासाठी ट्रान्झिट सदनिका उभारण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

 

Web Title: Dcm eknath shinde directives to accelerate the thane cluster scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MIDC
  • Thane news

संबंधित बातम्या

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
1

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
2

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम

Ashadhi Ekadashi 2026: ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह; विठ्ठल मंदिरांत विशेष पूजा, सुरक्षा व्यवस्था सज्ज
3

Ashadhi Ekadashi 2026: ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह; विठ्ठल मंदिरांत विशेष पूजा, सुरक्षा व्यवस्था सज्ज

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल
4

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.