Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा

Zp election Update : मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 04, 2026 | 03:50 PM
किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा (फोटो सौजन्य-Gemini)

किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

कर्जत : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान 7 फेब्रुवारीला होणार आहे तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. याचदरम्यान आता कर्जतमधून भाजप उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. चिंचवली येथील कॉर्नर सभेत भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यास करोडोंची विकास कामे करण्याचा निर्धार भाजप कडून मतदारांना आश्वासन देताना व्यक्त होत आहे.

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे प्रचार अंतिम टप्प्यात आहे. कर्जत तालुक्यातील माणगांव तर्फे वरेडी या गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, ठिकठिकाणी पदयात्रा आणि भेटीगाठींवर भर दिला जात आहे.

Kolhapur ZP Election : पावणेनऊ वर्षांनंतर कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणूक; ‘लक्ष्मी दर्शन’ आणि ‘काँटे की टक्कर’ची चर्चा

​ चिंचवली येथून सुरू झालेला हा प्रचार दौरा आता आंबिवली आणि परिसरात पोहोचला आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून झालेला विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राधिका ठाकरे यांना ‘कमळ’ या चिन्हावर मतदान करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून, राधिका ठाकरे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.भाजप तालुका माजी सरचिटणीस संजय कराळे आणि संदीप म्हसकर यांच्याकडून मतदारांना कॉर्नर सभेत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असे दिसून आले की, रेल्वे पट्ट्यातील भागातील महिलांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत नवीन बोअरवेल आणि विहिरी खोदून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना दिले आहे. किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यात जवळपास २५० कोटी रुपयांचा विकास निधी आणला असून, त्यापैकी माणगांव तर्फे वरेडी भागात १२ ते १३ कोटी रुपयांची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. या विकासकामांच्या जोरावरच आम्ही मतदारांकडे जात आहोत आणि आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

 

Web Title: Development works worth 250 crore by kiran thackeray mangav claims development of varedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • BJP
  • Karjat
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.