नेरळ जिल्हा परिषद गटातील कर्जत परिवर्तन आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली.कर्जत परिवर्तन आघाडीचे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांच्या प्रचाराची फेरी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाची वाडी,पायरमाल या भागात काढण्यात आली.त्यावेळी उमेदवारांसह नेरळ शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,उप शहर प्रमुख संतोष सारंग, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहर अध्यक्ष गणेश खराटे, उपाध्यक्ष प्रवीण ब्रह्मांडे,युवक शहर अध्यक्ष रोहन चव्हाण युवक कार्यकर्ते नफीद जळगावकर यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाले आहे.नेरळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कर्जत विकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवार यांच्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली.
कर्जत तालुक्यातील महाविकास परिवर्तन आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती उमेदवार भगवन चंचे हे उमेदवार गेली चार दिवस झाले नेरळ जिल्हा परिषद आणि पंचयात समिती वार्ड मध्ये गावो गावी तसेच खेड्या पाड्यामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन आपला प्रचार करत आहेत. नेरळ शहरामध्ये मध्ये हे उमेदवार आपला चांगल्या प्रकारे प्रचार करत आहे. नेरळ गावातील अनेक विकास कामे युवासेना कर्जत तालुका प्रमुख प्रथमेश मोरे यांनी करून घेतली आहेत.त्यामुळे असाच विकास आम्हाला संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद गटात करायचा आहे.त्यासाठी नेरळ जिल्हा परिषद गटातील मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनीता मोरे यांनी केले.
नेरळ शहराजवळ असलेली मोहाचीवाडी या गावामध्ये परिर्वतन विकास आघाडीचे उमेदवार प्रकार करत असताना.आम्ही प्रत्यके घरामध्ये गेल्यावर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.आम्ही जो चार दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला तच प्रकारे आज सुद्धा प्रतिसाद मिळत आहे आणि परिवर्तन विकास आघाडी ही नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे.आम्ही निवडून आल्यावर ज्या गाव खेड्यावर आणि नेरळ शहारामध्ये ज्या समस्या आहेत त्या सर्व समास्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नेरळ गणाचे उमेदवार नेरळ चे माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी केले.






