पहाटे ४ वाजेपर्यंत बार सुरू? डोंबिवलीत मध्यरात्री राडा, अश्लील शिवीगाळ अन् मारामारी; महिलांसह रहिवासी हैराण
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बार पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतो. मध्यरात्रीनंतर बारबाहेर ग्राहकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर अनेकदा मारामारीत होते. मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ केली जात असल्याने परिसरातील रहिवाशांना रात्री शांततेत राहणेही कठीण झाले आहे.
अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
या प्रकरणात बारविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. बारविरोधात कोणी तक्रार केल्यास तक्रारदाराला मारहाण केली जाते, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका तक्रारदाराने सांगितले की, संबंधित विभागाकडे बारविरोधात तक्रार केल्यानंतर तिच्या पतीला बारमालकाच्या लोकांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबाने पुढील तक्रार करणे बंद केले होते. मात्र, दररोज रात्री बारबाहेर होणारा गोंधळ आणि अश्लील शिवीगाळ यामुळे त्यांचा त्रास अद्याप कायम आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. दोन-दोन वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत संबंधित तक्रारदाराने पुन्हा एकदा पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. डाउन टाऊन बारविरोधात योग्य ती कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डोंबिवलीसारख्या शहरात निवासी परिसरात दररोज रात्री अशा प्रकारे गोंधळ होत असेल, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आता केडीएमसी आणि ठाणे पोलीस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन डाउन टाऊन बारप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
Ans: डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवर डाउन टाऊन बार अँड रेस्टॉरंट आहे.
Ans: बारबाहेर मध्यरात्रीनंतर दारूच्या नशेत मारामारी, वादावादी, अश्लील शिवीगाळ आणि गैरवर्तन होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
Ans: नागरिकांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.






