Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रवींद्र चव्हाण यांची मुंबईत मॅरेथॉन बैठक; विकास प्रकल्पांच्या वस्तुस्थितीचा घेतला आढावा

डोंबिवली शहर आणि आजुबाजूच्या परिसराचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची बैठक बोलावली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 21, 2025 | 02:25 PM
डोंबिवली .रवींद्र चव्हाण यांची मुंबईत मॅरेथॉन बैठक; विकास प्रकल्पांच्या वस्तुस्थितीचा घेतला आढावा

डोंबिवली .रवींद्र चव्हाण यांची मुंबईत मॅरेथॉन बैठक; विकास प्रकल्पांच्या वस्तुस्थितीचा घेतला आढावा

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली: शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या प्रकल्पांचे काम कूर्मगतीने पुढे जात असल्याने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची बैठक बोलावली होती. शहरातील पाणीटंचाई, फेरीवाले, अमृत, जलकुंभ उभारणी, स्व.शिवाजीशेठ शेलार मैदान, वेदपाठ शाळा, ठाकुर्लीच्या रहिवाश्यांसाठी प्रकल्प बधितांना पर्यायी घरांचे पत्र, विकास आदी विविध विषयांवर चर्चा झाली. त्या कामांना गती द्या असे चव्हाण यांनी आयुक्तांना सुचवले, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.त्यावेळी झालेल्या चर्चेतपश्चिम येथील जलकुंभ उभारणीकरिता शासनाकडून निधी उपलब्ध आहे, परंतु पाईपलाईन व्यवस्थापनाचे काम पूर्ण होण्यास अडीच महिने लागतील. त्या भागात पाणी वितरण व्यवस्थेचे पंपाच्या भूखंडावरील असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार आहे. पूर्व व पश्चिम येथे अमृत योजनेतून शासनाकडून १६५ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. सिव्हरेज टँक बांधकाम पूर्ण करा. पूर्व पाथर्ली झोपडपट्टी येथे असलेल्या बीएसयूपी प्रकल्पामधल्या गाळयांमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी आमदार निधी देणार. जोशी विद्यालय ते पश्चमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार म्हासोबा चौक पर्यंत करण्यासाठी भूसंपदानात येणाऱ्या विस्थापितांना पर्यांयी घरे देण्यासाठी वाटप पत्र देणे.

भगवान काटेनगरच्या रहिवाश्यांना रेल्वेकडून निष्कासन प्रश्नावर त्यांच्या पुनर्वसनाचा कृति आराखडा करून मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेणार. खंबालपाडयाचे शिवाजी शेलार मैदान विकासासाठी खासदार श्रीकांत शिंदे व चव्हाण यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. शिवमंदिर रोड येथे सुसज्ज असलेली वैकुंठ स्मशानभूमि बांधकामासाठी ६ कोटी निधी मंजूर आहे. डोंबिवली पश्चिम सम्राट चौक ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन ते रामनगर परिसरात फेरीवाले नकोत. शहराला जोडणारा रिंग रुट रोडचे काम पूर्ण करणे. महापालिकेची टिळकनगरमध्ये महापालिका आरक्षित भूखंडावर अध्यात्मिक प्रशिक्षणाकरिाता वेद पाठशाळा उभारणीसाठी दहा कोटींचा विकास आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठवणे. पूर्व-पश्चिम येथील झोपडपट्टी येथे दलित वस्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर गलिच्छ वस्ती सुधार योजनेतून तो आराखडा शासनाकडे पाठवणार. शहरातील तलाव कामांबाबतचा १५ कोटीमधून विकास गणेश नगर, जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट हे आराखडे करून शासनाकडे पाठवणे यावर विस्तृत चर्चा झाली.

पश्चिम येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) अंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामे व भारत सरकार यांच्याकडून भविष्यात प्राप्त होणाऱ्या निधी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी निर्देशित करण्यात यावे.
• गणेश नगर येथील खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
• जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
• कोपर गांव खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
• देवीचा पाडा खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
यांसदर्भात कामकाजाचा आणि शहरातील विकासाच्या दृष्टीने कोणती पाऊलं उचलण्यात येतील याबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांनी बैठकीत आढावा घेतला आहे.

Web Title: Dombivli ravindra chavans marathon meeting in mumbai reviewed the facts of the development projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Ravindra Chavan
  • thane

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…
1

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Thane Crime: व्हॉट्सअ‍ॅपवरून देहविक्रीचा रॅकेट,पोलिसांनी सापळा रचून दलाल महिलेला केली अटक; दोन मुलींची सुटका
2

Thane Crime: व्हॉट्सअ‍ॅपवरून देहविक्रीचा रॅकेट,पोलिसांनी सापळा रचून दलाल महिलेला केली अटक; दोन मुलींची सुटका

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास
3

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Local Body Election 2025: राज्यातील ‘मिनी विधानसभा’ निवडणुकांसाठी महायुती सज्ज;  इलेक्शनसाठी  नऊ महत्त्वाचे टार्गेट
4

Local Body Election 2025: राज्यातील ‘मिनी विधानसभा’ निवडणुकांसाठी महायुती सज्ज;  इलेक्शनसाठी  नऊ महत्त्वाचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.