crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ठाणे: ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. एक महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती. तिला अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केल्याचे समोर आले आहे.
कशी करायची दलाली
आरोपी महिला ही व्हॉट्सअॅपवरून तरुणींचे फोटो पाठवून ग्राहकांशी संपर्क साधायची आणि सौदे निश्चित करत होती. एकदा सौदा पक्का झाला त्यानंतर ती स्वतः तरुणींना घेऊन ठरलेल्या हॉटेलमध्ये पोहोचायची.
कशी केली कारवाई
आधी महिलेवर लक्ष ठेवले. त्यांनतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या सहाय्याने सापळा रचला.
दलाल महिलेशी संपर्क बनावट ग्राहकाने साधला. त्यानंतर संपर्क साधल्यानंतर तिने दोन तरुणींना घेऊन हॉटेलमध्ये येण्याचे कबुल केले. त्यानंतर तिने एका तरुणीचा सौदा 8,000 रुपये इतक्या रकमेत ठरवला. त्यावेळी तिला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ती 3,000 रुपये पीडित महिलेला देण्यात येणार होते, तर उर्वरित 5,000 रुपये आरोपी महिला स्वतःकडे ठेवणार होती, अशी कबुली तिने पोलीस चौकशीत दिली आहे.
गुन्हा नोंद
आरोपी महिलेवर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप चॅट तपासून ग्राहकांची माहिती तसेच या रॅकेटमधील इतर सहभागींचा शोध घेत आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी काहींना अटक करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या रॅकेटबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बॉलसाठी गेलेल्या दोन मुलांना सुरक्षारक्षकाची क्रूरता, दोन मुलांचे हात बांधून मारहाण
डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हाय प्रोफाईल सोसायटीत दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले. केवळ बॉल अंदर आला म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.