Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

आज विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2025 | 06:02 PM
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांची माहिती (फोटो सौजन्य-X)

शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांची माहिती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (24 जून) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणे आणि त्यांच्यातून नेते घडविणे ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. तेच आम्ही करीत आहोत, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळेस शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, कळवा – मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुफ्ती अशरफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…

एमआयएम, काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे. या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

कळव्यातील पक्षफुटीबाबत विचारले असता यावेळी आव्हाड यांनी सांगितले की, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कारण नवीन कार्यकर्ते घडविणे आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत. जणू काही 130 चे 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. पण इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुणे जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाही, याच्याशी आपणाला देणेघेणे नाही. कारण दुसर्‍याच्याघरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही. पोस्टवरून कोणाचे फोटो काढले जातात, कुणाचे फोटो टाकले जातात, हे समस्त कळवेकर पहात आहेत. त्यावर आपण भाष्य न केलेले बरे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हिंदीचा वाद लक्ष हटविण्यासाठी

पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे. मात्र, हिंदीचे कौतूक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालेच पाहिजे. जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपणाला उघडले जातील. ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी; पण, त्यासाठी सक्ती नसावी. महाराष्ट्राच्या मातीची ओळख ही मराठी आहे. त्यामुळे मराठीची सक्ती समजू शकतो. पण, मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणे हे अवघडच आहे. मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का? गुजरात, तमीळनाडू , बंगाल, ओरिसामध्ये अशी सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का? स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? ज्याला जे खायचे आहे; ते त्याला खाऊ द्यावे. ज्याला जे शिकायचे आहे ते त्याला शिकू द्यावे. पण, कशाचीच जबरदस्ती करू नये. अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असते, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा

“आमदार आपल्या भेटीला” हा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राबविण्यास सुरूवात करण्यात येत आहे. आज पक्ष कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्तिशः तक्रारदारांना भेटून सुमारे 50 पेक्षा अधिक तक्रारींचे निरसन केले.

काँग्रेसने केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; निवडणूक आयोगावरही केले आरोप

Web Title: Hundreds of workers from various parties joined the nationalist congress sharad pawar party on june 24 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
3

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली
4

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.