Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Maharashtra Drought : सोलापुरातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर टोला लगावला. पिकांचे पंचनामे होईपर्यंत रोटावेटर फिरवू नका, असं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 04:35 PM
शरद पवारांच्या 28 सप्टेंबरपासूनच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

शरद पवारांच्या 28 सप्टेंबरपासूनच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्या 28 सप्टेंबरपासूनच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला.
  • पुढील 15 दिवसांत पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता.
  • पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असं गोरेंनी स्पष्ट केलं.
 

Maharashtra Drought : राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाची मोठी तूट आणि लांबलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकट आलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची चाहूल लागली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दुष्काळ आणि टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी, टँकर, जनावरांचा चारा आणि पिकांच्या नुकसानीवर चर्चा झाली.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती.

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

शरद पवारांच्या दौऱ्यावर गोरेंचा खोचक टोला

शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यामुळे सरकारला काही फायदा होईल का, असा प्रश्न जयकुमार गोरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पवारांच्या अनुभवावरूनच खोचक प्रतिक्रिया दिली. ‘अशा अनुभवाने फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता,’ असं म्हणत गोरेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं सुरू आहेत. ही कामं याआधी झाली असती तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली नसती, असंही गोरे म्हणाले.

सोलापुरात 80 टक्के पिकांचं नुकसान?

सोलापुरात यंदा पावसाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं गोरेंनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पिकांचं नुकसान झालं आहे. पुढील 15 दिवसांत पाऊस पडला नाही तर नुकसान 100 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्ह्यातील 95 महसूल मंडलांपैकी 53 मंडलांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंदल्याचं ताज्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

‘पंचनामे होईपर्यंत रोटावेटर फिरवू नका’

सोलापुरात परतीचा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित असल्याचं गोरे म्हणाले. मात्र, पावसाची वाट बघत बसण्याऐवजी प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘शेतकऱ्यांनी पंचनामे होईपर्यंत पिकांवर रोटावेटर फिरवू नये,’ असं आवाहन गोरेंनी केलं. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे हातातून गेली असली तरी काही भागात परतीचा पाऊस झाला तर पिकं पुन्हा उभी राहण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

उजनी धरण भरलेलं असलं तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचं गोरे म्हणाले. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन वर्षभराचं पाणी राखीव ठेवण्याचं नियोजन सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवारांचा दुष्काळ दौरा, सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आणि सोलापुरातील गंभीर पाणी-पिकांचा प्रश्न यामुळे आगामी काळात दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra drought jaykumar gore sharad pawar drought tour solapur farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • drought news
  • Jaykumar Gore
  • Maharashtra Government
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?
1

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन
2

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

Maharashtr Tourism: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; विभागाचा सह्याद्री फार्म्स अन्  टाटा स्ट्राइव्हसोबत करार
3

Maharashtr Tourism: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; विभागाचा सह्याद्री फार्म्स अन् टाटा स्ट्राइव्हसोबत करार

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश
4

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.