Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण पश्चिममध्ये मोठी राजकीय घडामोड; वरुण पाटील यांचे बंड शमले, विश्वनाथ भोईर यांना जाहीर समर्थन

कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी जाहीर समर्थन दिले आहे. वरुण पाटील यांनी निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 11, 2024 | 09:56 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कल्याण पश्चिमेतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधातील भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचे बंड अखेर शमले आहे. महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण पाटील यापुढे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक काम करतील अशी ग्वाही दिली.

हे देखील वाचा- Maharashtra Election: “स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांचे…”; दिंडोशीतून उद्धव ठाकरेंविरुद्ध ‘राज’तोफ धडाडली

महायुती उमेदवारासोबत राहण्याची भूमिका

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यानंतरही भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली होती. परंतू भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरुण पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेकडे गेली असून वरुण पाटील यांनी युतीधर्म पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच वरुण पाटील हे संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी युतीधर्माचे पालन करावे अशा सूचना फडणवीस यांनी वरुण पाटील यांना दिल्या. तसेच फडणवीस यांच्या भेटीनंतर वरुण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत चर्चा झाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या शब्दांना मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसला तरी महायुती उमेदवारासोबत राहण्याची भूमिका घेतल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

तर भाजप पक्षश्रेष्ठींकडून वरुण पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई स्थगित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचेही कपिल पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शिवसेनेच्या महिला संघटक छायाताई वाघमारे, माजी नगरसेवक श्रेयस समेळ, यांच्यासह शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण पश्चिम मतदारसंघ लढत 

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बारसे अशी लढत होणार आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण पश्चिममधून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना चांगले मताधिक्क्य मिळाले होते त्यामुळे येथे शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड वाटत असले तरीही विधानसभा निवडणूकीचे समीकरण वेगळे असतात.   या मतदारसंघात मागील तीन निवडणूकीमध्ये मनसे, भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे यावेळी कोणती शिवसेना येते बाजी मारते हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.

Web Title: In kalyan west constituency varun patil has publicly supported vishwanath bhoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 09:56 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • shivsena

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
4

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.