Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी आहे. ठाणे पालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकेने देखील मंडप शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 02:31 PM
Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून स्थानिक महापालिका आणि पालिकेच्या माध्यमातून मंडप शुल्क आकारण्यात येते. मंडळांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी विविध मंडळांनी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ पालिकेला मंडप शुल्क रद्द करण्यासाठी पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला यश आले असून स्थानिक प्रशासनाकडून येत्या गणेशोत्सवासाठी आणि नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून आकारणाऱ्यात येणारे मंडप शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांकडून खासदार डॉ.शिंदे यांचे आभार मानले जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात. तसेच खासदार डॉ.शिंदे हे अनेक सार्वजनिक उत्सवांना आवर्जून उपस्थित राहतात. याच पद्धतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षी स्थानिक महापालिका व नगरपालिका उत्सवाच्या काळात मंडप उभारणीसाठी शुल्क आकारले जात होते. अनेक मंडळांनी हा आर्थिक भार लक्षात घेऊन मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. खासदार डॉ.शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत ठाणे, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच अंबरनाथ नगरपालिकेकडे पत्राद्वारे मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती.

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून स्थानिक प्रशासनाने येत्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून कोणतेही मंडप शुल्क आकारले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, दिवा, कळवा, मुंब्रा तसेच ठाणे येथील उत्सव मंडळांना दिलासा मिळाला असून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने साजरे होणारे हे उत्सव अधिक भव्य आणि आनंदी वातावरणात पार पडतील.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे समाजातील एकात्मतेचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानले जातात. या उत्सवांमधून समाजोपयोगी उपक्रम, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम राबवले जातात. परंतु, मागील काही वर्षांपासून मंडप शुल्कामुळे मंडळांवर आर्थिक ओझे वाढले होते. यावर्षी शुल्क रद्द झाल्यामुळे मंडळांकडे समाजोपयोगी उपक्रमांवर अधिक निधी खर्च करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वच सार्वजनिक मंडळांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Navi Mumbai : गणेशोत्सच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा महत्वाचा निर्णय ; धर्माचा आदर करा अन्यथा….

Web Title: Kdmc ambernath and ulhasnagar municipal corporations will not charge pavilion fees for ganeshotsav and navratri celebrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Ambernath
  • Ganesh Festival
  • KDMC
  • Thane news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
1

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
2

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.