
लोढा परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार? केडीएमसीकडून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; ४ ते ५ जेसीबींचा वापर
डोंबिवली पूर्वेतील लोढा परिसरात फेरीवाले, अनधिकृत टपऱ्या आणि दुकानांमुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. परिणामी, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. या समस्येमुळे स्थानिक रहिवासी अनेक वर्षांपासून त्रस्त होते.
Ujani Dam: माणूस आणि जनावरे तहानेने व्याकूळ; धारशिवला उजनी तारणार; ‘इतके’ पाणी मिळणार?
अखेर केडीएमसीने या अतिक्रमणांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. सहायक आयुक्त उमेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. यासाठी महापालिकेच्या पथकाकडून चार ते पाच जेसीबी यंत्रांचा वापर केला जात असून, अनधिकृत टपऱ्या आणि दुकानांसह बांधकामे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी परिसरातील मुख्य रस्ते अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांपासून मुक्त करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त उमेश यमगर आणि त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई केवळ दोन दिवसांपुरती मर्यादित राहणार नसून आगामी काळातही सुरू ठेवली जाणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडली आहे.
लोढा परिसरात सुरू असलेल्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि रस्त्यांवरील गर्दी यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता महापालिकेने अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्याने या समस्येतून सुटका होण्याची आशा रहिवाशांना वाटत आहे.
दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर प्रशासनाने अखेर कारवाई सुरू केल्याने आयुक्त अभिनव गोयल आणि सहायक आयुक्त उमेश यमगर यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. आता ही मोहीम सातत्याने सुरू राहते का आणि डोंबिवलीतील इतर मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवरही अशाच प्रकारे कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Ans: डोंबिवली पूर्वेतील लोढा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने आणि बांधकामांवर केडीएमसीने कारवाई केली आहे.
Ans: केडीएमसीचे सहायक आयुक्त उमेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनीही अधिकाऱ्यांना मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Ans: अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेकडून चार ते पाच जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे.