Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

Ulhas River Pollution: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नदीत मिसळणाऱ्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे महापालिका प्रशासनाकडून सादरीकरण करण्यात आले असून, कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2026 | 12:56 PM
उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

Follow Us
Follow Us:
  • उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प
  • कामाला लवकरच सुरुवात!
  • अनेक वर्षांच्या आंदोलनाला यश
Ulhas River Pollution: उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. लोणावळा परिसरातून उगम पावलेली उल्हास नदी बदलापूरजवळ बारवी- मुरबाडी नद्यांना येऊन मिळते.सिद्धगड किल्ल्याच्या परिसरात बारवी नदी उगम पावते. याचदरम्यान उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नदीत मिसळणाऱ्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक कैलास शिंदे उपस्थित होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.(Ulhas River Pollution)

KDMC News: उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे २४ तास पाणीपुरवठा बंद

नदी प्रदूषणाविरोधात अनेकदा नदीपात्रात उतरून आंदोलन

उल्हास नदी ही कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरासाठी महत्त्वाची नदी आहे. मात्र, नदीत विविध नाल्यांमधून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे, नितीन निकम आणि नगरसेवक महेश गायकवाड यांनी अनेकदा नदीपात्रात उतरून आंदोलन केले होते. नदीत मिसळणाऱ्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी आणि नदीचे प्रदूषण थांबवावे, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. केवळ स्वच्छतेची मोहीम राबवून हा प्रश्न सुटणार नसून, प्रदूषणाचा मूळ स्रोत असलेल्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

खासदार श्रीकांत शिंदे यांचाही पाठपुरावा

उल्हास नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पाठपुरावा केला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आंदोलनासोबतच प्रशासकीय स्तरावरही या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून, साडेसहा कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणादरम्यान प्रकल्पाची संकल्पना, कामाचे स्वरूप आणि अंमलबजावणी याबाबत माहिती देण्यात आली. प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रदूषण रोखणार

या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नाल्यांमधून थेट उल्हास नदीत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे. सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर नदीत मिसळणाऱ्या प्रदूषित पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका प्रशासनाने प्रकल्पाबाबत सादरीकरण केले असून, त्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार आहे.

अनेक वर्षांच्या मागणीनंतर महत्त्वाचे पाऊल

उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रश्नावर आंदोलने, निवेदने आणि सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता साडेसहा कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात आहे.

या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आणि सांडपाण्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते आणि प्रकल्पातून उल्हास नदीच्या प्रदूषणावर कितपत नियंत्रण मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे?

    Ans: उल्हास नदीत मिसळणाऱ्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

  • Que: या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा उद्देश काय आहे?

    Ans: नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रदूषित पाणी उल्हास नदीत मिसळण्यापासून रोखणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

  • Que: उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोणी पाठपुरावा केला?

    Ans: शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे, नितीन निकम आणि नगरसेवक महेश गायकवाड यांनी आंदोलन व पाठपुरावा केला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या प्रश्नासाठी प्रयत्न केले.

Web Title: Ulhas river pollution control six and half crore sewage treatment project kalyan dombivli sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News: उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे २४ तास पाणीपुरवठा बंद
1

KDMC News: उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे २४ तास पाणीपुरवठा बंद

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!
2

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन
4

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.