Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया आणि नवरात्रोत्सवावरील खर्च कमी करून तो निधी शेतकरी, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील सुविधांसाठी वापरण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 30, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळात लाखोंचा खर्च कशासाठी?
  • गरबा-दांडियाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वापरा
  • आयोजकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे
विजय काते, मिरा-भाईंदर : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामीण भागात पाणीटंचाई आणि शेतीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये होणाऱ्या भव्य गरबा-दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या आयोजनांवर पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्सवावरील मोठा खर्च टाळून तो निधी पाणीपुरवठा, ग्रामीण भागातील सुविधा आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीने मांडली आहे.

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

दुष्काळात लाखोंचा खर्च कशासाठी?

ग्रामीण भागातील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत असताना शहरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून भव्य कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे.

गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी मोठे मैदान, आकर्षक रोषणाई, ध्वनीव्यवस्था, कलाकार आणि इतर व्यवस्थांवर मोठा खर्च केला जातो. यंदा राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अशा खर्चिक आयोजनांवर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

गरबा-दांडियाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वापरा

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी यंदाचे मोठे गरबा-दांडिया कार्यक्रम रद्द करावेत किंवा ते अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. उत्सवासाठी खर्च होणारा पैसा ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वापरल्यास त्याचा थेट फायदा संकटग्रस्त भागाला होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

आयोजकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे

राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि नवरात्रोत्सव मंडळांनी राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशील भूमिका घ्यावी, असे आवाहन समितीने केले आहे. शासन आणि प्रशासनानेही मोठ्या गरबा-दांडिया कार्यक्रमांना परवानगी देताना स्थानिक पाणीस्थिती आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

उत्सवावर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी गरजेनुसार साधेपणाने आयोजन करून उर्वरित निधी सामाजिक कामांसाठी वापरण्याचा पर्याय स्वीकारता येईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे. यंदाचा नवरात्रोत्सव केवळ मनोरंजनाचा न राहता शेतकरी आणि ग्रामीण भागाला मदतीचा हात देणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra drought cancel grand garba dandiya events divert the funds to farmers and rural areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • Marathi News
  • Mira Bhayandar News

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
3

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!
4

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.