Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!

गणेशोत्सवापूर्वी झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, आवक वाढल्याने दर अचानक कोसळले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 11:10 AM
गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!

Follow Us
Follow Us:
  • ७०-८० रुपये किलोचा झेंडू आता १०-३० रुपयांवर आला आहे.
  • फुलांच्या विक्रीतून उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.
  • दर घसरल्याने काही शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी कल्याण एपीएमसीच्या फुल बाजारात दाखल झाले. मात्र, बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलोने विकला जाणारा झेंडू आता अवघ्या १० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुले बाजारात आणण्याचा वाहतूक खर्चही काढणे कठीण झाले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फुले विकून मिळणाऱ्या पैशातून गाडीचे भाडे आणि इतर खर्चही भागत नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली आहे.

Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध

अपेक्षांवर पाणी; वाहतूकखर्च काढणेही कठीण

दुसऱ्या एका फूल विक्रेत्याने सांगितले की, कल्याण एपीएमसीच्या बैल बाजारातील फुल बाजारात सध्या झेंडूचे भाव २० ते ४० रुपये किलोपर्यंत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असताना ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुलांच्या विक्रीतून गाडीचे भाडे काढणेही कठीण झाले आहे. गणेशोत्सवासाठी वर्षभर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच दर कोसळल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. फुलांच्या विक्रीतून उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

आवक वाढली, भाव घसरले

एका फूल व्यापाऱ्याने सांगितले की, यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली. मागील वर्षी नुकसान झाल्याने यंदा कमी भांडवलात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र, उत्पादन वाढल्याने बाजारात फुलांची आवक मोठ्‌या प्रमाणात झाली आणि त्याचा थेट परिणाम दरावर झाला. फुले हे नाशवंत पीक असल्याने ती एक-दोन दिवसांत विकावी लागतात. बाजारात ग्राहक कमी आणि आवक जास्त असल्याने फुले विकणेही अवघड होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांना फुले फेकून देण्याची वेळ येत असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

 

Web Title: Marigold flower prices fall ganeshotsav farmers loss maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • Thane news

संबंधित बातम्या

Pen Ganesh Idols Reach Delhi: माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणेशमूर्तींना थेट राजधानीत ‘राजमान्यता’
1

Pen Ganesh Idols Reach Delhi: माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणेशमूर्तींना थेट राजधानीत ‘राजमान्यता’

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल
2

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.