Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar Ajuba Bridge News: अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम

Mira-Bhayandar Ajuba Bridge News : मिरा-भाईंदर शहरातील अजुबा ब्रीज परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. परिसरातील मृत झाडे, वाढता मद्यपींचा वावर आणि स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 06, 2026 | 06:20 PM
अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम

अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • विकासकामांच्या नावाखाली वृक्षारोपण 
  • अस्वच्छता आणि मद्यपींचा वाढता वावर 
  • अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल
Mira-Bhayandar Ajuba Bridge News:  मिरा-भाईंदर शहरातील बहुचर्चित अजुबा ब्रीज परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ब्रीजवर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, मद्यपींचा वावरही वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मनसेचे शहराध्यक्ष संदिप राणे यांनी म्हटले आहे.

विकासकामांच्या नावाखाली वृक्षारोपण

अजुबा ब्रीज परिसरातील झाडांची योग्य देखभाल होत नसल्याने अनेक झाडे मृतावस्थेत असल्याचेही मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली वृक्षारोपण केले जाते, तर दुसऱ्या बाजूला लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि MMRDA प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

अस्वच्छता आणि मद्यपींचा वाढता वावर

अजुबा ब्रीज हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा या मार्गावरून होते. अशा ठिकाणी कचरा, अस्वच्छता आणि मद्यपींचा वाढता वावर ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे. प्रशासनाने तातडीने परिसराची स्वच्छता करावी, मृत झाडे हटवावीत तसेच मद्यपींच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल

दरम्यान, “अजुबा ब्रीजवरील घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. येत्या २४ तासांत ब्रीजची संपूर्ण स्वच्छता करून कचरा आणि मृत झाडे हटवली नाहीत, तर हा कचरा आणि मृत झाडे थेट MMRDA कार्यालयात आणून टाकू,” असा इशारा मनसे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदिप राणे यांनी दिला आहे.

नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही राणे यांनी दिला.

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

 

Web Title: Mira bhayandar ajuba bridge cleanliness mns ultimatum mmrda sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Mira Bhayandar Municipal Corporation
  • Mira Bhayandar News
  • mira bhaynder

संबंधित बातम्या

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम
1

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
2

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना
3

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.