Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bus Fare Hike: बस प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात 2 ते 14 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही दरवाढ कोणासाठी असणार आहे ते जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 10, 2026 | 11:32 AM
अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या...; प्रवाशांच्या अडचणी वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)

अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या...; प्रवाशांच्या अडचणी वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • महासभेत होणार निर्णय!
  • सामान्य बसच्या भाड्यात १४ रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव
  • तर एसी बसच्या भाड्यात ३५ रुपयांपर्यंत कपातीचा प्रस्ताव
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा गेल्या काही महिन्यांत खालावल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. इंधनाचे वाढते दर, बसच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च आणि परिवहन सेवा चालवण्यासाठी वाढलेला आर्थिक भार ही कारणे पुढे करत प्रशासनाने भाडेदरात बदल सुचवला आहे. दुसरीकडे, प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचे कारण देत वातानुकूलित बसच्या भाड्यात कपात करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे आगामी महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.(Bus Fare Hike)

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

विशेष म्हणजे, एकीकडे बस वारंवार बंद पडणे, वेळापत्रकानुसार बस उपलब्ध न होणे आणि प्रवाशांची गैरसोय होणे, अशा तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारण बसचे प्रस्तावित भाडेदर

प्रशासनाने सुचवलेल्या भाडेवाढीनुसार, दोन किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सध्या आकारले जाणारे ६ रुपये भाडे वाढवून ८ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. १० ते १२ किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्याचे १७ रुपये भाडे १८ रुपये, तर २८ ते ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी २६ रुपयांऐवजी ३६ रुपये आणि ३८ ते ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी ३२ रुपयांऐवजी ४६ रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे.

 सध्याचे भाडे

या प्रस्तावानुसार, प्रवासाच्या अंतरानुसार भाड्यात १ रुपयापासून १४ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

वातानुकूलित बसच्या भाड्यात कपात

सर्वसाधारण बसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावासोबतच वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्याचेही प्रशासनाने सुचवले आहे. सध्याच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे इतर शहरांतील परिवहन सेवांच्या भाडेदरांशी तुलना करून वातानुकूलित बसचे दर कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

वातानुकूलित

प्रस्तावानुसार, अंतरानुसार वातानुकूलित बसच्या भाड्यात ५ ते ३५ रुपयांपर्यंत कपात होऊ शकते. यामुळे वातानुकूलित बसकडे अधिक प्रवासी आकर्षित होतील आणि या सेवेचा वापर वाढेल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

इंधन आणि देखभाल खर्चात वाढ

मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वसाधारण बसचे भाडेदर २०१३ मध्ये, तर वातानुकूलित बसचे भाडेदर २०१६ मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर भाडेदरात बदल करण्यात आलेला नसल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

दरम्यानच्या काळात डिझेलचे दर, विद्युत बससाठी लागणारा खर्च तसेच बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी परिवहन सेवा चालवण्याचा आर्थिक भार वाढल्याने भाडेदरांचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेत डिझेलवर चालणाऱ्या ७४ आणि विद्युतचलित ५७ अशा एकूण १३१ बस आहेत. या बस शहरांतर्गत मार्गांवर तसेच ठाणे आणि मुंबईच्या दिशेने धावतात. शहरातील दैनंदिन प्रवासासाठी अनेक नागरिक या बससेवेवर अवलंबून आहेत.

भाडेवाढीपूर्वी सेवा सुधारणे गरजेचे?

गेल्या काही महिन्यांपासून परिवहन सेवेच्या दर्जाबाबत तक्रारी पुढे येत आहेत. बसची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे बस वारंवार बंद पडत असल्याचे प्रकार घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्यापूर्वी बसची नियमित उपलब्धता, वेळापत्रकाचे पालन, देखभाल-दुरुस्ती आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने खर्चवाढीचे कारण दिले असले, तरी त्याचवेळी परिवहन सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे.

यापूर्वी २०२२ मध्येही भाडेवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यात आला होता; मात्र तो फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा एकदा भाडेदरांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण बसच्या प्रवाशांवर आर्थिक भार टाकणाऱ्या या प्रस्तावाला महासभा मंजुरी देणार की प्रवाशांच्या अडचणींचा विचार करून वेगळा निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, हा भाडेवाढीचा आणि भाडेकपातीचा प्रस्ताव आहे. महासभेची मंजुरी मिळून अधिकृत निर्णय होईपर्यंत प्रस्तावित दर लागू झाल्याचे समजू नये.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Web Title: Mira bhayandar mbmt bus fare hike proposal ordinary bus ticket price increase sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
1

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
2

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
4

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.