Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; पाणी शुद्धीकरणासाठी एक्सपायरी केमिकल वापराचा दावा

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 06:29 PM
लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; पाणी शुद्धीकरणासाठी एक्सपायरी केमिकल वापराचा दावा

लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; पाणी शुद्धीकरणासाठी एक्सपायरी केमिकल वापराचा दावा

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदरच्या लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?
  • पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापराचा गंभीर आरोप
  • स्थायी समितीत घोटाळा उघड
विजय काते, भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (Mira Bhayandar News) पाणीपुरवठा विभागातील एका महत्त्वाच्या निविदेवरून शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सोडियम हायपोक्लोराइट (Sodium Hypochlorite) या रसायनाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून २०२४ मध्ये मुदत संपलेले (एक्सपायरी) केमिकल वापरले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक जय ठाकूर यांनी शुक्रवार (३१ जुलै) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. या आरोपामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली असून, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोत यांनी संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सदर निविदा मंजुरीची प्रक्रिया स्थगित करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

Marathi Language: मराठी सक्तीवर राजकारण सुरू; पण मीरा-भाईंदरातील रिक्षाचालकांनी दाखवली भाषेप्रती सकारात्मक भूमिका

२ कोटींच्या निविदेत उघड झाला प्रकार

महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागाने स्थायी समितीसमोर प्रकरण क्रमांक ९३ अंतर्गत शहरातील २८ पाणीपुरवठा केंद्रांवर कार्यरत डिजिटल स्वयंचलित क्लोरीन केंद्रांची देखभाल, दुरुस्ती आणि सोडियम हायपोक्लोराइट रसायनाच्या पुरवठ्यासाठी अंतिम मंजुरीचा प्रस्ताव सादर केला होता. या कामाचा अंदाजित खर्च २ कोटी १ लाख ३० हजार ६६१ रुपये (जीएसटी वगळून) इतका आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर १२ मे ते २२ मे २०२६ या कालावधीत फेरनिविदा प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत मे. मरक्युरी (इंटरनॅशनल) प्रा. लि. यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा भरल्याने त्यांना पात्र ठरविण्यात आले. या निविदेला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मंजुरी, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आर्थिक मंजुरी, ९ जुलै २०२६ रोजी निविदा समितीची शिफारस आणि १२ जुलै २०२६ रोजी महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ७३(क) नुसार अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला.

बैठकीत जय ठाकूर यांचा गंभीर आरोप

स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना जय ठाकूर यांनी प्रशासनाकडे उपलब्ध कागदपत्रांचा संदर्भ देत सांगितले की, शहरातील पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे काही केमिकल २०२४ मध्येच एक्सपायर झालेले असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रसायनांचा वापर करून संपूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरवले जात असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर असून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत, इतक्या महत्त्वाच्या सेवेत गुणवत्ता तपासणी का करण्यात आली नाही? मुदतबाह्य रसायनांचा पुरवठा कोणी स्वीकारला? त्याची तपासणी कोणी केली? आणि इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न उपस्थित केले.

मुदतबाह्य रसायन वापरणे किती धोकादायक?

जय ठाकूर यांनी सांगितले की, पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराइट, क्लोरीन आणि ब्लिचिंग पावडर यांसारख्या रसायनांना निश्चित कालमर्यादा असते. मुदत संपल्यानंतर या रसायनांची जंतूनाशक क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे पाण्यातील धोकादायक जीवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट होत नाहीत. असे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्यास उलट्या, जुलाब, पोटदुखी, टायफॉईड, गॅस्ट्रो, त्वचेचे विकार यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय कालांतराने रसायनांमध्ये रासायनिक विघटन होऊन काही हानिकारक संयुगे तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रसायनांचा वापर करणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडून चौकशीचे संकेत

या गंभीर आरोपांनंतर स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोत यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्याचे कंत्राट रद्द करण्याचे संकेतही देण्यात आले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लाखो नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मिरा-भाईंदर शहरातील लाखो नागरिकांना दररोज महापालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य रसायनांचा वापर झाल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पाण्याच्या गुणवत्तेची स्वतंत्र प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून संपूर्ण अहवाल जाहीर करावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे .

तसेच या वृत्तातील मुदतबाह्य रसायनांच्या वापराबाबतचे आरोप स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक जय ठाकूर यांनी केले आहेत. या आरोपांबाबत महापालिका प्रशासन किंवा संबंधित ठेकेदाराची अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे.

Mumbai : मिरा-भाईंदर महापालिकेत वेतनाचा घोळ! औषध फवारणी विभागातील १५० कामगारांचे मानधन थकीत

Web Title: Mira bhayandar news water chemical expired chemical allegation standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Water Issue

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.